Horoscope - March 4, 2021: Don't take on new tasks; Virgo people are clever in spending their days in silence today | राशीभविष्य - ४ मार्च २०२१: नवीन कार्य हाती घेऊ नका; कन्या राशीतील व्यक्तींनी आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी

राशीभविष्य - ४ मार्च २०२१: नवीन कार्य हाती घेऊ नका; कन्या राशीतील व्यक्तींनी आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी

मेष -  आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. पण दुपारनंतर मात्र हर प्रकारे आपणाला संयमाने व्यवहार करावा लागेल. आणखी वाचा

वृषभ -व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा

मिथुन -  गणेशजी सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा

कर्क -आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे आपल्या हिताचे ठरेल. आणखी वाचा

सिंह - आज धार्मिक यात्रेचा संकेत श्रीगणेश देतात. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणारांना काळ लाभदायक आहे. आणखी वाचा

कन्या-  कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. आणखी वाचा 

 

 

तूळ – आजच्या दिवसाचा प्रारंभ समतोल आणि दृढ वैचारिकतेने होईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या.  आणखी वाचा

वृश्चिक - अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल असे श्रीगणेश सांगतात. मनात येणार्‍या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात जपून राहा. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. मान- सन्मान व उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात लाभाची शक्यता. अपघातापासून जपा. आणखी वाचा

मकर - स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणाला प्रोत्साहन देतील. बढतीचे योग आहेत. आणखी वाचा

कुंभ -आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. दीर्घकालीन प्रवासाची योजना आखाल. धार्मिक स्थळी यात्रा होण्याचे संकेत आहेत. दुपारनंतर व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आणखी वाचा

मीन - कोणाशी वादविवाद किंवा बांडण करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण राहील. सुखमय बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपारनंतर अनुकूल काळ आहे. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - March 4, 2021: Don't take on new tasks; Virgo people are clever in spending their days in silence today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.