शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - २१ मार्च २०२२: मकर राशीतील व्यक्तींकडून तडकाफडकी निर्णय घेतला जाईल; नोकरीतही बदलीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 08:03 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरात किरकोळ कारणावरुन कुरबूर होईल. बोलण्याच्या ओघात कुणाला दुखवू नका. मनात थोडे काळजीचे विचार राहतील. 

वृषभ- महत्वाच्या कामात अडचणी राहतील. मनावर ताण राहील. संयम सोडू नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. काही अडचणी असतील तरी मदत करण्यासाठी लोक पुढे येतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. 

मिथुन- काहींना अचानक धनलाभ होईल. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. मुलांच्या संगतीकडे नीट लक्ष द्या. मुलांना विश्वासात घेऊन संवाद साधा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रवसात अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. 

कर्क- जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू मिळू शकते. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. अनुकूल प्रतिसाद मिळेल. घरात किरकोळ कारणावरुन गैरसमज होतील. पाहुणे येतील. नोकरीत बदली होऊ शकते. 

सिंह- व्यवसायात अडचणी येतील. मोठी गुंतवणूक करु नका. भावडांशी गैरसमज होतील. दुरावा निर्माण होईल. प्रवासात काळजी घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. 

कन्या- जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून मगच सही करा. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आर्थिक व्यवहार जपून करा. कुणाला उसने पैसे देताना विचार करुन द्या. मुलाच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. 

तूळ- जीवनसाथीची काळजी घ्या. बोलण्यात गोडवा असू द्या. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवाक सामान्य राहील. मुलांशी संवाद ठेवा. 

वृश्चिक- महत्वाच्या कामात अडचणी येतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात अडचणी येतील. प्रवासाचे नियोजन नीट करा. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. 

धनू- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. काही पैसे सहजासहजी मिळतील. तर काही वसुली करण्यात अडचणी येतील. जमीनींच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. 

मकर- व्यवसायात आगेकूच सुरु राहील. प्रेमात सफलता मिळेल. मात्र कसोटीचे प्रसंग येतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. तडकाफडकी निर्णय घेतला जाईल. 

कुंभ- जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे सौदे ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. प्रवासात दगदग होईल.

मीन- विविध प्रकाराचे लाभ होतील. आर्थिक आवाक मनासारखी राहील. वाहने जपून चालवा. महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. काहींना एखाद्या व्यवहारातून मनस्ताप सहन करावा लागेल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष