शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राशीभविष्य - 5 फेब्रुवारी 2022: ग्रहमान अनुकूल आहेत, जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 07:34 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - महत्वाचे काम शक्यतो पुढे ढकलणे ठीक राहिल. प्रवासात धावपळ करावी लागेल. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. काही अत्यावश्यक खर्च होतील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहिल. पूजाअर्चा करण्याकडे ओढा राहिल. थोडा थकवा जाणवेल. 

वृषभ - गृहमानाची उत्तम साथ राहिल. मनासारखे यश मिळेल. नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजुने राहिल. मित्र, नातेवाईक, सहकारी यांची साथ मिळेल. वडिलधाऱ्या मंडळीचे मार्गदर्शन उपलब्ध ठरेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. कामात उत्साह राहिल. 

मिथून - व्यवसायात स्पर्धक आव्हान उभं करतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत महत्वाच्या प्रकल्पात सहभागी व्हावे लागेल. नोकरीचे प्रयत्न करत असाल तर चांगली संधी मिळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. वावविवाद टाळणे योग्य ठरेल. 

कर्क - चांगल्या बातम्या कानावर पडतील. आनंदी वातावरण राहिल. प्रसिद्धी मिळेल. कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. टीका करणाऱ्यांना दूर ठेवा. काहींना प्रवास करावा लागेल. महत्वाच्या कामात यश मिळेल.  

सिंह - महत्वाचे काम पुढे ढकलण्यात योग्यता राहिल. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. मुलांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करा. प्रवास शक्यतो टाळा.

कन्या - घरी पाहुणे येतील, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. लोकांची ये-जा चालू राहिल. कायद्याची बंधने पाळा, मनासारखी अर्थप्राप्ती होईल. जोडीदाराशी सूर जुळतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहिल. नवीन योजनांची आखणी करा. 

तूळ - कामाचा व्याप वाढताना तारेवरची कसरत करावी लागेल. आर्थिक आवक चांगली राहिल. कुणावरही चटकन विश्वास ठेवू नका. थोडे विचार करुन निर्णय घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. तब्येतीकडे लक्ष द्या. पथ्य पाळणे आवश्यक आहे. 

वृश्चिक - प्रवास घडून येतील. प्रवासात नवीन ओळखी होतील. कामे मार्गी लागतील. नशिबाची अनुकूलता राहिल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. घर, शेती, खरेदीचे व्यवहार पूर्ण होतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. 

धनू - धनलाभाच्या दृष्टीने काळ चांगला आहे. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. मनासारखे बदल होतील. मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्या. घरी पाहुणे येतील. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद घेता येईल. 

मकर - पैशाची अनावश्यक उधळपट्टी आवरली पाहिजे. काहींना प्रवास करावा लागेल. व्यवसायात भरभराटी होईल. कायद्याची बंधने पाळा. घरातील उपकरणांच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये. अभ्यासावर लक्ष द्या. 

कुंभ - विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ देता येईल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. आनंदवार्ता कानावर पडतील. 

मीन - ग्रहमान अनुकूल आहेत, जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहिल. व्यवसायात आगेकूच सुरू राहिल. नोकरीत प्रगती होईल. आवडत्या छंदासाठी वेळ द्या. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१