शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

राशीभविष्य - १ फेब्रुवारी २०२२: आर्थिक आवक चांगली, मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 07:47 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- मित्रांच्या भेटीगाठी होतील, त्यांच्याशी गप्पा रंगतील. एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. मात्र, तुमची मते इतरांना रुचणार नाहीत. आरोग्यात सुधारणा होईल. कामात उत्साह राहिल. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल, बदलीची शक्यता आहे. 

वृषभ - आर्थिक बाजू बळकट होईल, जुनी येणी वसूल होतील, जीवनसाथीची काळजी घ्या, तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. केवळ मौजमजेसाठी सोबत राहणाऱ्या मित्रांना दूर ठेवा. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या, आर्थिक आवक चांगली राहिल. प्रवासात दगदग होईल. 

मिथून - खरेदीची हौस पूर्ण करता येईल, जीवनसाथीचे मोलाचे सहकार्य मिळेल. गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे, मनात सकारात्मक विचार राहतील. रागाला वेसण घालणे आवश्यक आहे, गाडीचा वेग मर्यादित ठेवा. महत्त्वाचे काम पुढे ढकलले ठिक राहिल. 

कर्क - जोडीदाराच्या मर्जीने वागा, आर्थिक बाजू चांगली राहिल. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. एखादी मनाविरुद्ध घटना घडू शकते. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. पैसा वाया जाणार नाही याची काळजी घ्या. मित्र-नातेवाईक यांची मदत मिळेल. 

सिंह - घराच्या सजावटीकडे लक्ष देण्यासाठी मदत मिळेल, खर्चाचे प्रमाण वाढेल, एखादा निष्कारण खर्च होईल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. कामात उत्साह आणि चपळता राहिल. 

कन्या - कामात व्यस्त राहाल, खूप वेळ त्यासाठी द्यावा लागेल. मनासारखे भोजन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहिल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. प्रेमात रुसवा फुगवा राहील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. त्यामुळे आनंद होईल. 

तुळ - मुलांना घवघवीत यश मिळेल, त्यांचा नावलौकिक होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उधळपट्टीला आवर घातला पाहिजे. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. प्रवास शक्यतो टाळलेले बरे. प्रवासात दगदग होईल. वेळेचा अपव्यय टाळणे महत्त्वाचे राहिल. 

वृश्चिक - विविध प्रकारचे लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटी होतील, सतत लोकांच्या कोंडाळ्यात राहाल. आर्थिक फायदा होईल. तुमच्या शब्दाला किंमत राहिल. धंद्यात बरकत राहिल. विक्रीचे प्रमाण अधिक राहिल.

धनू - उसने पैसे देताना विचार करुन द्या. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. व्यवसायात गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आवडते पदार्थ ताटात दिसतील. आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल, अशी कामे करू नका. 

मकर - आर्थिक देवाण-घेवाण करण्यावरुन कुरबुरी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याच्यादृष्टीने हालचाली होतील. प्रेमात यश मिळेल, मनात आनंदी विचार राहतील. भेटीगाठी होतील. व्यवसायात कागदोपत्री पुर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. 

कुंभ - जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील, आवडत्या छंदासाठी वेळ काढता येईल. कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. मनावर ताण राहणार नाही. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे व्यवहार जुळून येतील. 

मीन - कामाचा ताण राहिल, आपण कुशलतेने व सर्वांची मर्जी राखून काम पूर्ण कराल. जीवनसाथीशी सूर जुळतील. एखाद्या व्यक्तीकडून भ्रमनिरास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय काम करता येईल. घरात आनंदी वातावरण राहिल.  

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषhoroscope 2021राशिभविष्य २०२१Zodiac Signराशी भविष्य