Horoscope - 5 March 2021: People in Libra will have a dilemma today; Don't start a new job, be patient | राशीभविष्य - ५ मार्च २०२१: तूळ राशातील व्यक्तींची आज द्विधा मन:स्थिती राहील; नवीन काम सुरु करु नका, वाणीवर संयम ठेवा

राशीभविष्य - ५ मार्च २०२१: तूळ राशातील व्यक्तींची आज द्विधा मन:स्थिती राहील; नवीन काम सुरु करु नका, वाणीवर संयम ठेवा

मेष -  श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा आपला दिवस आध्यात्मिक दृष्टीने वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ आणि रहस्यमय विद्या आत्मसात करण्यात गोडी वाटेल. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ - दांपत्यजीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाल आणि दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसोबत उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सांगतात की कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. घरात सुखाचे आणि शांतीचे वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल.  आणखी वाचा

कर्क - अगदी शांत राहून आजचा दिवस घालवा अशी सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उद्भवतील. प्रेमिकांमध्ये वादविवाद होऊन मतभेद होतील. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येतील. त्यामुळे उदासीनता जाणवेल. जमीन, घर, वाहन इ. व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास दिवस चांगला नाही. आणखी वाचा

कन्या-  शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसमवेत वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांची चाल हाणून पाडाल. आणखी वाचा

तूळ – आज द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सांगतात. नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवा. त्यामुळे कुटुंबीयांशी वादविवाद होणार नाहीत. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबात आनंदात दिवस घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. प्रिय व्यक्तींशी भेट सफल आणि आनंददायक ठरेल. एखादी शुभवार्ता मिळेल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस कष्टप्रद जाईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध आणि आवेश राहील. त्यामुळे कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. तब्बेत बिघडेल. बोलणे आणि वागणे यांवर संयम ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश म्हणतात की आजच्या लाभप्राद दिनी एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस शुभ आहे. शेअर- सट्टा या मध्ये धन लाभ होईल. मित्र आणि संबंधित यांच्याशी भेट झाल्याने आनंद वाटेल. आणखी वाचा

कुंभ -श्रीगणेशाच्या आशीर्वादा बरोबरच वरिष्ठ अधिकारी आणि वयोवृद्धांची आपणावर कृपादृष्टी राहील. आपली सर्वकामे अगदी सरळपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की आज शरीर आणि मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजीत टाकील. नोकरीत उच्च पदाधिकार्‍यांशी वादविवाद होतील आणि त्यांची नाराजी ओढवून घ्याल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - 5 March 2021: People in Libra will have a dilemma today; Don't start a new job, be patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.