Horoscope - 01 October 2020: Family conflict will make the mind sad; There will be a lack of enthusiasm and happiness | राशीभविष्य - ०१ नोव्हेंबर २०२०: कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल; उत्साह अन् आनंद यांचा अभाव राहील

राशीभविष्य - ०१ नोव्हेंबर २०२०: कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल; उत्साह अन् आनंद यांचा अभाव राहील

मेष - श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. आज घडणार्‍या घटनांमुळे आपण काळजीत पडाल. श्रीगणेशाच्या मते आपले स्वास्थ्य बिघडेल आणि डोळ्याचे विकार बळावतील. आणखी वाचा

मिथुन -  श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिच्या दृष्टिने योग्य दिवस. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे असे श्रीगणेशांना वाटते. प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढतीचे योग. अधिकार्‍याबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आणखी वाचा

सिंह -  मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. व्यवहार न्यायपूर्ण असेल. आज धार्मिक तसेच मंगल कार्यात तुम्ही मग्न रहाल असे श्रीगणेश पाहताहेत. धार्मिक प्रवास घडतील. आणखी वाचा

कन्या - नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. स्वभाव रागीट बनेल म्हणून बोलण्यावर संयम ठेवा. आणखी वाचा

तूळ –मित्र आणि प्रियजनांसोबत प्रवासाचे योग होईल.  शरीर आणि मनाची तंदुरुस्ती चांगली राहील. तुम्हाला मान- सन्मान मिळेल.

वृश्चिक - घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा. शत्रूवर मात होईल. आणखी वाचा

धनु - आज प्रवास न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या विषयी चिंतेने मन व्याकूळ होईल. कामे अपूर्ण राहिल्याने निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश पाहताहेत की, आज आपली मनःस्थिती व आरोग्य काही चांगले असेल. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. आणखी वाचा

कुंभ - आज आपणास मनाने हल्के हल्के वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांबरोबर काही आयोजन कराल. त्यांच्याबरोबर वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश आज आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहेत. रागावर व वाणीवर ताबा ठेवा नाहीतर मन दुःखी होईल. पैशाचे, देण्याघेण्याचे व्यवहार सावधतेने करा. मन व शरीराचे आरोग्य मध्यम राहील.  आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - 01 October 2020: Family conflict will make the mind sad; There will be a lack of enthusiasm and happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.