शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

Video: चिठ्ठीत भजनलाल शर्मांचे नाव वाचून वसुंधरा राजेंना धक्का; कॅमेऱ्याने टिपले हावभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 9:30 PM

Vasundhara Raje Video: भाजप हायकमांडने वसुंधरा राजे यांना डावलून पहिल्यांदा आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले आहे.

Rajasthan New CM Bhajanlal Sharma: आज अखेर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपने प्रस्थापितांना डावलून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले. जयपूर येथील भाजप कार्यालयात पक्षाच्या बैठकीनंतर शर्मांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत निरीक्षक राजनाथ सिंह यांच्यासह वसुंधरा राजे आणि इतर ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते. 

वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणे राजस्थानमध्येही नवीन चेहऱ्याला संधी दिली. हा वसुंधरा राजे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, व्यासपीठावर राजे यांनी चिठ्ठीमध्ये भजनलाल यांचे नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले.

3 डिसेंबर रोजी निकाल आल्यापासून वसुंधरा राजे यांनी आपली ताकद दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 4 आणि 5 डिसेंबर रोजी त्यांनी जयपूरमध्ये त्यांच्या निकटवर्तीय आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर दिल्लीला पोहोचून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. दिल्लीहून परतल्यानंतरही वसुंधरा राजे यांनी जयपूरमध्ये आमदारांची भेट घेतली. रिपोर्ट्सनुसार, भाजपने वसुंधरा राजे यांना विधानसभा अध्यक्ष बनण्याचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी नकार दिला.

विरोधकांचा टोमणादरम्यान, वसुंधरा राजे यांच्या प्रतिक्रियेवर विरोधी पक्षाने टोला लगावला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी X वर व्हिडिओ शेअर करत लिहिले, "अक्कड बक्कड बंबे बो..." याशिवाय, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, माजी मुख्यमंत्र्यांसाठी हा धक्कादायक क्षण होता.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारणRajnath Singhराजनाथ सिंह