शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 06:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला.

रवी टालेभारतीय जनता पक्षाचा राजस्थानातील विजय, त्या राज्यातील मतदारांनी रूढ केलेल्या दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याच्या परंपरेला जागणारा असला तरी, काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांनी तो सुकर केल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. वस्तुतः निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात भाजप हा काँग्रेसपेक्षाही जास्त दुभंगलेला पक्ष होता; परंतु त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्वरेने पावले उचलत, आवश्यक ती तटबंदी करून नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घातला. दुसरीकडे काँग्रेस नेतृत्व मात्र त्या बाबतीत हतबल भासत होते आणि ती हतबलताच अखेर पक्षाला भोवल्याचे दिसत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला. त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयांवरील भूमिका मतदारांना भावल्याचे जाणवत आहे. अंतर्गत लाथाळ्यांना आवर घातल्यानंतर, भाजपने मोदींचा चेहरा समोर करून, स्थानिक मुद्दयांवर भर देत अत्यंत परिणामकारक निवडणूक प्रचार यंत्रणा राबविली. अशोक गेहलोत सरकारच्या विरोधातील प्रस्थापितविरोधी लहरीनेही भाजपचे काम सोपे केले. शेतकरी, महिला आणि युवा वर्गात राज्य सरकारच्या विरोधात स्पष्ट रोष दिसत होता. त्याचा लाभ घेण्याचे काम भाजपच्या कुशल निवडणूक यंत्रणेने चोखपणे बजावले. दुसरीकडे काँग्रेसची प्रचार यंत्रणा मात्र अगदीच दिशाहीन भासत होती आणि त्याचेच प्रतिबिंब निकालात उमटल्याचे दिसत आहे. 

भाजपपुढे मुख्यमंत्री पदाचे आव्हानभाजपला निवडणुकीत विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार असल्याने पुन्हा मतभेद उफाळू न देण्याचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वाला पेलावे लागणार आहे. अंतर्गत मतभेद उफाळू न देण्यात भाजप नेतृत्व यशस्वी ठरल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला मागील यशाची पुनरावृत्ती करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. कॉंग्रेसलाही अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील मतभेदांवर एकदाचा तोडगा काढावाच लागणार आहे. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक