शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

कोण आहेत योगी बालकनाथ, ज्यांना राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 15:18 IST

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत लोकांची वसुंधरा राजे आणि सचिन पायलट यांच्यापेक्षा योगी बालकनाथ यांना पसंती

Rajasthan Election:राजस्थानमध्ये पुन्हा गेहलोत यांची जादू चालणार की, 5 वर्षात सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम राहणार, हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालातून स्पष्ट होईल. निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलने भाजप आणि काँग्रेसची धाकधूक वाढली ​​आहे. विविध एक्झिट पोलनुसार, काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. यादरम्यान, भाजच्या गोटातून मुख्यमंत्रीपदासाठी एक नावही समोर आलं आहे, ज्याने सर्वांनाच चकीत केलंय. 

आज तक अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी लोकांची पहिली पसंती अशोक गेहलोत यांना होती. सर्वेक्षणात ज्या लोकांशी चर्चा करण्यात आली, त्यापैकी 35 टक्के लोकांना गेहलोत यांनाच मुख्यमंत्री पाहायचे आहे. मात्र, या यादीत ना वसुंधरा राजे यांचे नाव आहे ना सचिन पायलट यांचे नाव आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर महंत बालकनाथ योगी यांचे नाव आहे. सर्वेक्षणात 10 टक्के लोकांनी बालकनाथ योगी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, कोण आहेत बालकनाथ योगी?

कोण आहेत बालकनाथ योगी?महंत बालकनाथ योगी यांचा जन्म 16 एप्रिल 1984 रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. बालकनाथ योगी हे अलवरचे खासदार आहेत. भाजपने त्यांना तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक असलेले बाबा बालकनाथ योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घालतात. त्यामुळे लोक त्यांना राजस्थानचे योगी म्हणतात. बाबा बालकनाथ यांची अलवर आणि आसपासच्या परिसरात मजबूत पकड असल्याचे मानले जाते. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ते भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला फिट बसतात. निवडणुकीपूर्वी भाजपने राजस्थानमध्ये आपल्या युनिटची घोषणा केली, तेव्हा त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले.

वयाच्या 6 व्या वर्षी घर सोडलेत्यांच्या कुटुंबाने त्यांना वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी महंत खेतनाथ यांच्याकडे अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. महंत खेतनाथ यांनी लहानपणीच त्यांना गुरुमुख नाव दिले होते. महंत खेतनाथ यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर ते महंत चंदनाथ यांच्याकडे आले. त्यांची बालसुलभ प्रवृत्ती पाहून महंत चंद नाथ त्यांना बालकनाथ म्हणू लागले. महंत चंद नाथ यांनी 29 जुलै 2016 रोजी त्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. महंत बालकनाथ योगी हे हिंदू धर्मातील नाथ संप्रदायाचे आठवे संत आहेत. बालकनाथ योगी हे बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपतीही आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या जवळचेयोगीसारखे भगव्या कपड्यात दिसणारे बाबा बालकनाथ आपल्या आक्रमक वृत्तीमुळे अनेकदा चर्चेत राहतात. बाबा बालकनाथ यांनी 2019 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भंवर जितेंद्र सिंह यांचा 3 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. बाबा बालकनाथ हे त्याच नाथ संप्रदायाचे महंत आहेत, ज्यांच्याशी योगी आदित्यनाथ संबंधित आहेत. बालकनाथ हे रोहतक येथील बाबा मस्तनाथ मठाचे महंत आहेत. नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार योगी आदित्यनाथ हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर रोहतक गद्दी यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे. त्यामुळे ते सीएम योगींच्या जवळचे मानले जातात.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाAshok Gahlotअशोक गहलोत