शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

राजस्थानात भाजपानं तिकीट नाकारलेल्या विद्यार्थी नेत्यानं दिला दिग्गजांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 11:53 IST

सकाळपासून निवडणुकीतील मतमोजणी सुरू झाल्यापासून या मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे.

जोधपूर - राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. या निवडणुकीत भाजपानं जबरदस्त कामगिरी केली आहे. काँग्रेसच्या हातून राजस्थान, छत्तीसगड निसटण्याची चिन्हे आहेत. त्यात राजस्थानातही भाजपानं मुसंडी घेत १०० चा आकडा पार केला आहे. या निवडणुकीत शिव विधानसभा जागेवर सर्वांचे लक्ष होते. कारण इथं भाजपाशी बंडखोरी करून एका विद्यार्थी नेत्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

सकाळपासून निवडणुकीतील मतमोजणी सुरू झाल्यापासून या मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे. इथं अपक्ष उमेदवार रविंद्र सिंह भाटी मतदारसंघातील इतर दिग्गज उमेदवारांवर भारी पडताना पाहायला मिळत आहेत. सकाळी ११ च्या आकडेवारीनुसार, या मतदारसंघात काँग्रेस, भाजपा यांच्यासह अनेक उमेदवार पिछाडीवर आहे. रविंद्र सिंह भाटी हे १६ हजार ८६३ मतांनी पुढे आहेत. तर दुसऱ्या नंबरवर अपक्ष उमेदवार फतेह खान ९ हजार ३२२, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार अमीन खान यांना ६ हजार ६३४ मते पडली आहेत. तर चौथ्या नंबरवर RLP चे उमेदवार जालम सिंह यांना ३ हजार २५८ मते आणि भाजपा उमेदवार स्वरुप सिंह खारा यांना २ हजार ४४८ मते पडली असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. 

कोण आहे रविंद्र सिंह भाटी?रविंद्र सिंह भाटी यांचं नेतृत्व विद्यार्थी चळवळीतून पुढे आले आहे. ते जोधपूर विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. या निवडणुकीपूर्वी रविंद सिंह भाटी यांनी भाजपात प्रवेश केला होता. परंतु निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाटी हे बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उतरले. आतापर्यंतच्या कलामध्ये शिव विधानसभा जागेवर भाजपाची मते रविंद सिंह भाटी यांच्याकडे वळताना दिसतायेत. तर मुस्लीम मते अमीन खान आणि फतेह खान यांच्यात विभागली गेली आहेत. 

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस