शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे; अशोक गहलोत यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:31 IST

उद्या आणखी पाच आश्वसनं दिल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक?, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. 

केंद्रीय यंत्रणा ईडी भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. काल आम्ही राजस्थानमधील जनतेला दोन आश्वसन दिल्यानंतर आज ईडीने काँग्रेसच्या काही नेत्यांच्या घरांवर छापे टाकले. उद्या आणखी पाच आश्वसनं दिल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक?, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. 

भाजपा जितका ईडीचा दुरुपयोग करेल, तितक्या काँग्रेसच्या जागा वाढतील, असं अशोक गहलोत म्हणाले. भाजपाच्या हातातील बाहुले बनलेली ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे. भाजपा आमच्या मदत योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांचे लोक यासाठी प्रयत्नशील आहेत. ईडीच्या लोकांनी राजस्थानमध्येच भाड्याने घरे घेतली असतील आणि त्यांच्या कुटुंबियांना येथे स्थलांतरित केले असेल कारण त्यांना आता २५ नोव्हेंबरपर्यंत येथे राहावे लागेल, असा टोलाही ईडीने मारलेल्या छाप्यांवर लगावला आहे.

दरम्यान, राज्यात काँग्रेसचे सरकार येताच राज्यातील १.०५ कोटी कुटुंबांना ५०० रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्यात येईल, असे अशोक गहलोत म्हणाले. तसेच गृह लक्ष्मी हमी अंतर्गत, कुटुंबातील महिला प्रमुखाला वर्षाला १०,००० रुपये दिले जातील. ही रक्कम दोन ते तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.  झुंझुनू येथील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या या घोषणेवर राजस्थानचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला अशा घोषणा करून कोणताही फायदा होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांना (काँग्रेस) खरोखरच महिलांना फायदा व्हावा असे वाटत असेल तर तशी घोषणा आधी करता आली असती.

२५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार-

राजस्थानच्या २०० विधानसभा जागांसाठी २५ नोव्हेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबर ही मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली होती. २३ नोव्हेंबर रोजी देवोत्थान एकादशी असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि शुभ व धार्मिक उत्सव होणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन मतदानाची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली. आयोगाने याचा विचार करून मतदानाची तारीख २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबर अशी केली.

राजस्थानमध्ये ५.२५ कोटी मतदार-

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील ५.२५ कोटी मतदार आपले सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. राज्यात २.७३ कोटी पुरुष आणि २.५२ कोटी महिला मतदार आहेत. राजस्थानमध्ये सरकार कोण बनवणार हे ठरवण्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या २२.०४ लाख मतदारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा