शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Election 2023 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अशोक गेहलोत सरदारपुरामधून तर सचिन पायलट टोंकमधून निवडणूक लढवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 15:55 IST

काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत चार एससी, चार एसटी आणि ९ जाट नेत्यांना उमेदवारी दिली आहे.

आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ३३ उमेदवारांची नावे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट यांना पक्षाने तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या यादीत पाच मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत चार एससी, चार एसटी आणि ९ जाट नेत्यांना उमेदवारी दिली आहे.

याचबरोबर काँग्रेसने दोन आमदारांची तिकिटे कापली केली आहेत. यामध्ये चित्तोडमधून चंद्रभान सिंह आणि सांगानेरमधून अशोक लाहौती यांना तिकीट दिले नाही. तसेच, संतोष अहलावत यांना सूरजगडमधून तिकीट देण्यात आले आहे. २०१३ मध्ये त्यांनी सूरजगडमधूनच विधानसभा जिंकली होती. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे लोकसभेचे तिकीट रद्द करण्यात आले होते तर २०१४ मध्ये त्या झुंझुनूमधून खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या.

गोविंद सिंह दोतासरा लाच्छमनगडमधून तर मुकेश भाकर लाडनूनमधून निवडणूक लढवणार आहेत. बायतूमधून हरीश चौधरी, मालवीय नगरमधून अर्चना शर्मा आणि नाथद्वारातून सीपी जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे. दिव्या मदेरणा यांना ओसियनमधून तिकीट मिळाले आहे. दरम्यान, शांती धारिवाल, महेश जोशी आणि धर्मेंद्र राठोड या तीन नेत्यांची नावे उमेदवारांच्या यादीत नाहीत. पक्षाने त्यांना नोटिसा बजावल्या असून या नेत्यांशी संबंधित जागांसाठी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

काँग्रेसच्या यादीत समाविष्ट असलेल्या ३३ नावांपैकी ३२ उमेदवारांची नावे जुनी आहेत. पक्षाने मुंडावार मतदारसंघातून ललित यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मागची निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) तिकिटावर लढवली होती. काँग्रेसच्या पहिल्या यादीत सचिन पायलट गटातील चार नेत्यांना तिकीट देण्यात आले आहे. इंद्रसिंग गुर्जर यांना विराटनगरमधून, रामनिवास गवारिया यांना परबतसरमधून आणि अमित चचन यांना नोहर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

भाजपने ८३ उमेदवारांची जाहीर केली दुसरी यादी भाजपनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपची ही दुसरी यादी असून त्यात ८३ उमेदवार आहेत. यापूर्वी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ४१ उमेदवार होते. भाजपच्या दुसऱ्या यादीत अनुसूचित जातीच्या १५ जणांना स्थान मिळाले आहे. १० महिलांना तिकीट देण्यात आले असून १० अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोत