शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"विमानतळापेक्षा रेल्वे स्टेशन चांगले बनवणार", PM नरेंद्र मोदींकडून जोधपूरमध्ये अनेक प्रकल्पांची पायाभरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:52 IST

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील जोधपूरमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली.

राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, मात्र आगामी निवडणुकीत भाजप सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमधील जोधपूरमध्ये आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी राजस्थानला अनेक मोठ्या प्रकल्पांची भेट देत आहेत. 

नरेंद्र मोदी  म्हणाले, "राजस्थान हे असे राज्य आहे, जिथे प्राचीन भारताचे वैभव दिसून येते, ज्यामध्ये भारताचे शौर्य, समृद्धी आणि संस्कृती दिसून येते. काही काळापूर्वी जोधपूरमध्ये झालेल्या G20 बैठकीत जगभरातून आलेल्या पाहुण्यांनी कौतुक केले होते. प्रत्येकाला एकदातरी जोधपूरला भेट देण्याची इच्छा आहे. आज राजस्थानमध्ये रेल्वे मार्गावर जलद गतीने काम सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत केवळ 600 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले. राजस्थानमधील 80 हून अधिक रेल्वे स्थानके विकसित केली जात आहेत. विमानतळापेक्षा रेल्वे स्टेशन चांगले बनवणार आहे."

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील जोधपूरमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांच्या दौऱ्यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे राजस्थानमधील दोन नवीन रेल्वे सेवांचे उद्घाटन. पहिली रुनिचा एक्स्प्रेस आहे, जी जैसलमेर ते दिल्लीला जोडणारी ट्रेन आहे, जी प्रवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुविधा देते. दुसरी हेरिटेज ट्रेन सुरू करण्यात आली आहे, जी मारवाड जंक्शन ते खांबळी घाटाला जोडणारी आहे. 

रेल्वे सेवेशिवाय नरेंद्र मोदींनी दोन रेल्वे प्रकल्पही राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये 145 किमी लांबीच्या 'डेगाणा-राय का बाग' रेल्वे मार्ग आणि 58 किमी लांबीच्या 'डेगणा-कुचमन सिटी' रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचा समावेश आहे.  या रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणामुळे रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढेल आणि या प्रदेशात वाहतूक कार्यक्षमता सुधारेल.

याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनही केले. जोधपूरमधील AIIMS येथे 350 खाटांचे ट्रॉमा सेंटर आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक बांधणे ही प्रमुख घडामोडींपैकी एक आहे. ही सुविधा प्रगत गंभीर काळजी सेवा प्रदान करेल आणि प्रदेशातील आरोग्य सेवा सुधारण्यास हातभार लावणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थान