शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 18:13 IST

'देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. पण काँग्रेसने भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली.'

अजमेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी (31 मे) राजस्थानच्या अजमेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते अनेक शहरांमध्ये रॅली काढून आपल्या कामाची माहिती देत आहेत. मोदींनी राजस्थानमधील पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात दर्शन घेऊन सभांना सुरुवात केली. यानंतर अजमेर येथील रॅलीतून काँग्रेसवर जोरदार टीका केली.

अजमेरमधील रॅलीदरम्यान राजस्थान भाजपचे प्रमुख सीपी जोशी यांनी पगडी घालून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात देवी अहिल्याबाई होळकर यांनाही आदरांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या 9 वर्षातील कामांची माहिती देताना विरोधकांवरही हल्लाबोल केला. 2014 पूर्वीची देशातील परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये रोज हल्ले व्हायचे, महिलांवर अत्याचार व्हायचे. पंतप्रधानांवर वेगळे राज्यकर्ते होते. पूर्वी योग्य निर्णय घेतले गेले नाहीत, धोरणेही ढिसाळ होती, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

एका मताने किती बदल झाले?पीएम मोदी पुढे म्हणाले की, 2014 मध्ये जनतेच्या एका मताने विकासाचा निर्णय घेतला गेला. त्याचाच परिणाम म्हणजे आज जगभरात भारताचे कौतुक होत आहे. आज जगातील नामवंत तज्ज्ञ सांगत आहेत की, आज भारत गरिबी संपवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. हा बदल एका मताने आला आहे. 50 वर्षांपूर्वी काँग्रेसने देशातील गरिबी हटवण्याची हमी दिली होती. गरिबांशी काँग्रेसचा हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. हमी देणे ही या पक्षाची जुनी सवय आहे. गरिबांना फसवायचे, गरिबांसाठी नुसती तळमळ दाखवायची हे काँग्रेसचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मोदींकडे पैसा कुठून येतो?केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप सरकारची ही 9 वर्षे देशवासीयांच्या सेवेसाठी, सुशासनासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. आज विरोधक प्रश्न विचारतात की मोदींकडे पैसा कुठून येतो. आपल्या देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. सर्व पैसा विकासात खर्च करणे आवश्यक आहे. पण यापूर्वी काँग्रेसने अशी भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली होती जी देशाला पोकळ बनवत होती.

85 टक्के कमिशनसह काँग्रेसआपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी राजीव गांधींच्या भाषणाचाही उल्लेख केला, ज्यामध्ये ते म्हणाले होते की, जर सरकार 1 रुपया पाठवला तर नागरिकांपर्यंत पोहचत नव्हता. 85 टक्के कमिशन घेण्याची काँग्रेसची सवय जुनी आहे. गेल्या 9 वर्षात भाजप सरकारने आधुनिक महामार्ग आणि रेल्वेवर सुमारे 24 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पण इथे काँग्रेस असती तर मधेच तो पैसा लुटला गेला असता. लुटमारीचा प्रश्न येतो तेव्हा काँग्रेस कोणाशीही भेदभाव करत नाही. काँग्रेसने देशातील प्रत्येक नागरिकाची लूट केली. त्यांच्यासाठी गरीब, शोषित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, अपंग सर्व समान आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस