शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये  वसुंधरा राजे यांची भाजपत उपेक्षा? ओमप्रकाश माथूरही बैठकांपासून दूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 06:42 IST

Lok Sabha Election 2024: राजस्थानमधील भाजपचे आमदार व माजी कॅबिनेट मंत्री श्रीचंद कृपलानी यांना गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कोणीही बसायला खुर्चीही दिली नाही.

- जितेंद्र प्रधानजयपूर : राजस्थान भाजपच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व ओमप्रकाश माथूर या दोन नेत्यांना सध्या पक्षाने  बाजूला सारले आहे किंवा हे दोन नेतेच पक्षकार्यात फारसे सक्रिय नाहीत, असे म्हटले जाते. गेल्यावर्षीच्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्रिपदी कोणाला निवडायचे, याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत वसुंधरा राजेंचा सहभाग नव्हता. त्यांच्याशी निष्ठावंत असलेल्यांची भाजप नेतृत्वाकडून उपेक्षा केली जात असल्याची भावना आहे.

प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकांमध्ये नेहमी उपस्थित राहाणारे ओमप्रकाश माथूर गेल्या काही दिवसांपासून या बैठकांमध्ये सहभागी झालेले दिसले नाहीत. तसेच वसुंधरा राजेदेखील कोअर कमिटीच्या बैठका तसेच भाजपच्या संघटनात्मक बैठकांपासून दूर असल्याचे चित्र आहे.

या नेत्यांनाही आला उपेक्षेचा अनुभवराजस्थानमधील भाजपचे आमदार व माजी कॅबिनेट मंत्री श्रीचंद कृपलानी यांना गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कोणीही बसायला खुर्चीही दिली नाही. सरतेशेवटी ते भाजप कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसले. राहुल कासवान यांना भाजपने लोकसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने पक्षत्याग करून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. राजस्थान विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित न केल्याने भाजप नेतृत्वावर त्या पक्षाचे प्रल्हाद गुंजाल यांनी टीका केली होती. त्यांनाही भाजप नेतृत्वाने बाजूला सारले असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४rajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा