शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! वाढदिवशी पती दुसऱ्या मुलीसोबत सापडला; संतापलेल्या पत्नीने २ मुलांसह संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:28 IST

आपल्या पतीला वाढदिवशी अन्य महिलेसोबत पाहताच पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले.

जोधपूर : आपल्या पतीला वाढदिवशी अन्य महिलेसोबत पाहताच पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले. राजस्थानच्या जोधपूरमधील या हृदयद्रावक घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मृत महिला पतीच्या प्रेयसीसोबत भांडताना दिसत आहे. जोधपूर जिल्ह्यातील मथानिया परिसरातील सुरेश विश्नोई हा जोधपूरच्या रतनदा भागात भाड्याच्या खोलीत राहत होता. पेशाने टॅक्सी चालक असलेल्या सुरेशच्या एका चुकीच्या पावलाने कुटुंब उद्धवस्त झाले.

दरम्यान, मागील रविवारी सुरेशचा वाढदिवस असल्याने पत्नीने त्याला गावी येण्यास सांगितले. दिवसभर वाट पाहूनही तो घरी न आल्याने पत्नीने त्याला अनेकदा फोन केला. पण सुरेशने फोन न उचलल्याने पत्नी काळजीत पडली. सुरेशसोबत संपर्क न झाल्याने त्याची २५ वर्षीय पत्नी निरमा आपल्या दोन मुलांसह उमेद नगरहून जोधपूरकडे रवाना झाली. 

पतीला दुसऱ्या तरूणीसोबत पाहताच बसला धक्का खरं तर ती पतीला वाढदिवशी सरप्राईज देणार होती. सकाळी आठ वाजता ती पती राहत असलेल्या घरी पोहचली अन् दरवाजा ठोठावला. आपली पत्नी आणि मुलांना पाहून सुरेशला धक्का बसला. पण खोलीत पत्नी निरमा गेली असता तिलाही धक्का बसला. कारण खोलीत एक तरूणी वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. हे दृश्य पाहून निरमा संतापली अन् तिने पतीसह त्याच्या प्रेयसीला खडेबोल सुनावले. याशिवाय तिने या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला.

दोन मुलांसह संपवलं जीवन आपला पती अन्य एका तरूणीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे समजताच निरमाला अश्रू अनावर झाले. ती पुन्हा मथानियाकडे निघाली. पतीचे हे कृत्य सहन न झाल्याने ती अर्ध्यातूनच बस मधून उतरली. यानंतर निरमा थेट जवळच्या रेल्वे स्थानकावर गेली आणि तिने आपल्या मुलांसह फलोदीहून जोधपूरच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. 

  

टॅग्स :Rajasthanराजस्थानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूrailwayरेल्वेhusband and wifeपती- जोडीदार