शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'त्यानं पत्नी गमावली..., ₹25 लाख नुकसान भरपाई द्या'; 12 वर्ष तुरुंगात राहिलेला पती निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 18:50 IST

सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

पत्नीच्या हत्येप्रकरणी एका आरोपी पतीला ठोठावण्यात आलेली जन्म ठेपेची शिक्षा चुकीची असल्याचे, राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने तब्बल 12 वर्षांनंतर संबंधित पतीची तुरुंगातून मुक्तता केली. एवढेच नाही, तर संबंधित आरोपी अर्जदाराला तीन महिन्यांच्या आत 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेशही राज्य सरकारला दिला आहे. याच बरोबर, कनिष्ठ न्यायालयाने संबंधित आरोपीला ठोठावलेला जन्मठेपेची शिक्षाही उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

आरोपीच्या पतीने आत्महत्या केल्याचे पुराव्यावरून सिद्ध होते. यामुळे त्यांनी केवळ आपली पत्नीच गमावली नाही, तर सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायाधीश पंकज भंडारी आणि न्यायाधीस भुवन गोयल यांनी आरोपी इक्बाल यांचे अपील स्वीकारत हा आदेश दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित वकील राजेश गोस्वामी आणि निखिल शर्मा यांनी सांगितले की, 13 मे 2011 रोजी इकबालच्या पत्नीचा जळाल्याने मृत्यू झाला होता.

पोलिसांनी लावला होता पत्नीच्या हत्येचा आरोप -पती इकबालनेच पत्नीची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात सादर केले होते. ही घटना गलता गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. जयपूरच्या महिला अत्याचार प्रकरणाशीसंबंधित विशेष न्यायालयाने संबंधित आरोपीला पत्नीच्या हत्येत दोषी ठरवत 11 मे 2016 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होतीय

टॅग्स :Rajasthanराजस्थानCourtन्यायालयPoliceपोलिसLife Imprisonmentजन्मठेपhusband and wifeपती- जोडीदार