शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची राजस्थानमध्ये कारवाई!गृहराज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या १० ठिकाणी एकाचवेळी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:03 IST

राजस्थानमध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे.

राजस्थानमध्ये लहान मुलांच्या अन्न घोटाळा प्रकरणात आरोप असणाऱ्यांविरोधात आता ईडीने कारवाई केली आहे. राजस्थान सरकारचे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या दहा ठिकाणांवर आज ईडीने एकाच वेळी छापे टाकले आहेत.  भोजन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या संदर्भात ईडीने राज्याचे गृहराज्यमंत्री यादव यांच्या जयपूर, बेहरोर आणि विराटनगरसह १० ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ईडी या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

"मी पाकिस्तानातून मित्राला भेटायला आलेय"; ट्रेनमध्ये सापडली मुलगी, चौकशीत धक्कादायक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळीच राजस्थानला पोहोचली. त्यानंतर कोतपुतलीसह गृहराज्यमंत्री यादव यांच्या अन्य ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकण्यास सुरुवात झाली. याप्रकरणी वर्षभरापूर्वी आयकर विभागाच्या पथकाने राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले होते. 

माध्यान्ह भोजनातील मुलांसाठी पोषक आहार ठरलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त दराने खरेदी करण्यात आला. गृहराज्यमंत्री यादव यांच्या कंपन्यांचा यात सहभाग असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याचा संबंध गृहराज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या संबंधीत असल्याने हे प्रकरण चर्चेत आले होते. यावरून त्यावेळीही राजकारण झाले होते. आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. 

राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारच्या मंत्र्यांच्या घरावर टाकलेल्या धाडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारवर ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप केला. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय