शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्हाला राजस्थानमध्ये जागा नाही'; CM पदाच्या चर्चेत असणाऱ्या बालकनाथ यांचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 08:40 IST

सध्या योगी बालकनाथ यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहेत.

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये योगी बालकनाथ यांच्या नावाचीही चर्चा आहे. सध्या योगी बालकनाथ यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहेत. तिजारा विधानसभा मतदारसंघातून ६,१७३ मतांनी विजयी झालेल्या बालकनाथ यांचे त्यांच्या समर्थकांनी राजस्थानचे दुसरे योगी म्हणून वर्णन केले आहे.

सध्या योगी बालकनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये योगी बालकनाथ एका कार्यक्रमादरम्यान चोर आणि बदमाशांना इशारा देत आहेत. त्या व्हिडीओमध्ये योगी बालकनाथ म्हणत आहेत, 'जे लोक आज राजस्थानमध्ये खुलेआम गोळीबार करत आहेत, गुंडगिरी करत आहेत त्यांना योगी बालकनाथ यांनी इशारा दिला आहे.

कान उघडून ऐका...बंगाल किंवा कर्नाटकचे रेशनकार्ड वेळेवर बनवून घ्या, तुम्हाला आता राजस्थानमध्ये जागा नाही. तुम्हाला राजस्थानमध्ये लपायला जागा मिळणार नाही, आम्ही प्रत्येकाला शोधून त्याच्या कृत्याची शिक्षा देऊ, असं योगी बालकनाथ व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. 

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत योगी बालकनाथ का पुढे आहेत?

योगी बालकनाथ यादव समाजातील आहेत. राजस्थानमध्ये ओबीसी असल्याने ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत इतर चेहऱ्यांपेक्षा पुढे आहेत. बालकनाथ यादव असल्याने उत्तर प्रदेश-बिहार तसेच हरियाणाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते.  भाजपाच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक असलेले बालकनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घालतात. त्यामुळे लोक त्यांना राजस्थानचे योगी म्हणतात.

वसुंधरा राजेंनी जेवणाचे केले आयोजन

राजस्थानमध्ये १९९ जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ११५ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसला केवळ ६९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राजस्थानमध्ये स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर आता भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून मंथन सुरू झाले आहे. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर अवघ्या एक दिवसानंतर राजस्थानमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आमदारांसाठी डिनरचे आयोजन केले होते, त्याचाही राजकीय अर्थ काढला जात आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाRajasthanराजस्थान