शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

"दर ५ वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही...", काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 13:53 IST

आम्ही प्रत्येक वेळी खूप मेहनत करतो, पण दर पाच वर्षांनी पराभव का होतो, ते कळत नाही, असे सचिन पायलट म्हणाले.

टोंक : राजस्थानमध्ये दरवेळेप्रमाणे यावेळीही प्रथा कायम ठेवून सत्तापरिवर्तन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपाने आपले सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही प्रत्येक वेळी खूप मेहनत करतो, पण दर पाच वर्षांनी पराभव का होतो, ते कळत नाही, असे सचिन पायलट म्हणाले.

बुधवारी टोंकमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघातील लोकांप्रती सचिन पायलट यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी, सचिन पायलट म्हणाले, केवळ सभागृहाच्या आत आणि बाहेर नवीन सरकारची जबाबदारी सांगणार नाही, तर मजबूत विरोधी पक्षाची भूमिकाही बजावणार आहे. तसेच, निवडणुकीपूर्वी भाजपाचे अनेक मोठे नेते दिल्लीहून राजस्थानमध्ये आले होते. त्या नेत्यांनी राज्यातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. त्यामुळे आम्ही त्यांना आश्वासने पूर्ण करण्यास सांगू. नवीन सरकार अजूनही आपले मंत्रिमंडळ स्थापन करू शकले आहे, परंतु आम्ही त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असे सचिन पायलट यांनी सांगितले.

यादरम्यान, सभेला संबोधित केल्यानंतर सचिन पायलट यांनी आपला मुद्दा मांडला आणि विरोधी पक्षात बसूनही आपण कमजोर होणार नाही, कारण यावेळी आम्ही ७० च्या संख्येने विजयी झालो आहोत, असे सांगितले. दरम्यान, सचिन पायलट हे काँग्रेसच्या पराभवाचे दुःख गावकऱ्यांपासून लपवू शकले नाहीत. सचिन पायलट गावकऱ्यांसमोर म्हणाले की, "आम्ही दरवर्षी मेहनत करतो. पण का पराभव झाला माहीत नाही. यावेळी आम्हाला विजयाची पूर्ण अपेक्षा होती, पण त्याचा निकाल असा आला की आम्ही पराभूत झालो."

भजनलाल शर्मा यांच्याकडे राज्याची कमान राजस्थान विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाने नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांच्याकडे राज्याची कमान सोपवली आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. तसेच भाजपाने राज्यात दोन नवीन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती केली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ११५ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ ६९ जागा मिळाल्या होत्या.  

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक