शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 19:49 IST

महत्वाचे म्हणजे, संघटनेचे संस्थापक राजवर्धन सिंह परमार यांनी, अजमेर दर्गा हे एक शिव मंदिर होते, ज्याला दर्गा बनवण्यात आले, असा दावा केला होता...

राजस्थानातील अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका कनिष्ठ न्यायालयाने स्वीकारली आहे. तसेच, न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली असून 5 डिसेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता यांनी अजमेरमधील ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हिंदूंचे पूजा स्थळ असल्याचे म्हणत ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर बुधवारी अजमेर पश्चिम दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग मनमोहन चंदेल यांच्या न्यायालयाने सुनावणी केली. दरम्यान, फिर्यादी विष्णू गुप्ता यांच्या दाव्याची दखल घेत न्यायाधीश मनमोहन चंदेल यांनी दर्गा समिती, अल्पसंख्याक व्यवहार आणि एएसआय यांना समन्स नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

दर्गा हिंदू मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा -हिंदू संघटना दीर्घकाळापासून अजमेर दर्गा हा हिंदूंचे मंदिर असल्याचा दावा करत आहेत. 2022 मध्ये महाराणा प्रताप सेना या हिंदू संघटनेने हे हिंदू मंदिर असल्याचा दावा करत तत्कालीन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केंद्र सरकारला पत्र पाठवून याची चौकशी करण्याची मागणी केली होती. महराणा प्रताप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक फोटोही पाठवला होता. ज्यात अजमेर दर्ग्याच्या खिडक्यांवर स्वस्तिक असल्याचा दावाही करण्यात आला होता. 

महत्वाचे म्हणजे, संघटनेचे संस्थापक राजवर्धन सिंह परमार यांनी, अजमेर दर्गा हे एक शिव मंदिर होते, ज्याला दर्गा बनवण्यात आले, असा दावा केला होता.

टॅग्स :Courtन्यायालयTempleमंदिरRajasthanराजस्थान