जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारला अपघात

By निखिल म्हात्रे | Updated: November 16, 2023 14:39 IST2023-11-16T14:38:40+5:302023-11-16T14:39:34+5:30

जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

zilla parishad education officer car accident in alibaug raigad | जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारला अपघात

जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारला अपघात

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्या कारला अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. पेणकडून अलिबागकडे येत असताना गुरुवारी (दि.16) कार्लेखिंडीत हा अपघात घडला. या अपघातात एकजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव दिवाळीच्या सुट्टीनंतर गुरुवारी सकाळी नियमीत कामावर निघाल्या. त्या कारमधून प्रवास करीत असताना कार्लेखिंड येथील पात्रुदेवी मंदिराजवळ आल्या असता वळणावर अचानक कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कठड्याला आदळली व अपघात झाला. या अपघातात चालकाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: zilla parishad education officer car accident in alibaug raigad