वैभव गायकर,पनवेल: वसुदेव कुटुंबकम चा संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर आपल्या दुचाकीने निघालेल्या नवी मुंबई मधील योगेश आळेकरी यांची दुचाकी युके मधील नॉटिंगहॅम मधुन चोरीला गेल्याने आळेकर यांच्या प्रवासाला दुर्दैवी ब्रेक लागला आहे.योगेशने 1 मे रोजी सुरु केलेल्या प्रवासा दरम्यान तब्बल 17 देश दुचाकीवर सर केले आहेत.या प्रवासादरम्यान योगेश अनेकवेळा जंगलात देखील वास्तव्यास होते.मात्र नॉटिंगहॅम सारख्या शहरातुन दिवसा ढवळ्या हि चोरी झाल्याने योगेश हातबल झाले आहेत.
भारत सरकारकडे योगेशने मदतीची हाक दिली आहे.चोरी झालेल्या गेलेल्या दुचाकी सोबत योगेश यांचा भारतीय पासपोर्ट,मॅक बुक,360 डिग्री कॅमेरा,कॅम्पिंगचे सामान,कपडे,रोख रक्कम,व्हिसा,महत्वाचे कार्ड,छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आदी चोरीला गेले आहे.विशेष म्हणजे या घटनेतील तीन चोरटे दुचाकी चोरी करताना स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत तरी देखील नॉटिंगहॅम पोलिसांना त्यांचा थांग पत्ता लावता आलेला नसल्याने योगेश प्रचंड तणावात आहे.ऑलेंटन पार्क या नॉटिंगहॅम शहरातील पे अँड पार्क मधून हि दुचाकी चोरीला गेली आहे.योगेशने सोशल मीडियाद्वारे आपल्या देशवासियांकडे मदतीची मागणी केली आहे.जगभ्रमंती करून आपल्या देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवणारा योगेश आळेकर अडचणीत आलेला आहे.ऑगस्ट महिन्यात दि.28 रोजी हि घटना घडून आठवडा उलटूनही अद्याप योगेशच्या दुचाकीचा शोध लागलेला नाही.
योगेशने नेपाळ,इराण,उझबेकिस्तान,कझाकिस्तान,चीन,रशिया,युरोप,जर्मनी,बेल्जीयम,नॉर्वे यांसारख्या महत्वाच्या देशातून प्रवास केला आहे.मात्र युके सारख्या प्रगत देशात अशाप्रकारची चोरीची घटना घडल्याने आंतराष्ट्रीय पातळीवर पर्यटकांना देखील एक धोक्याची घंटा आहे.तब्बल 18500 किमीचा प्रवास योगेशने दुचाकीद्वारे पूर्ण केला आहे.
योगेश आळेकर यांनी युके मधील भारतीय दूतावासात नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला आहे.पुढील काही दिवसात त्यांना नवीन पासपोर्ट मिळेल.मात्र दुचाकी आणि इतर मौल्यवान सामान भेटत नाही तोपर्यंत त्यांच्या पुढील देशांच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे.
अतिशय दुर्दवी घटना माझ्यासोबत घडली आहे.युके मधीलनॉटिंगहॅम शहरातून माझी दुचाकी चोरटयांनी चोरली.याबाबत मी स्थानिक नॉटिंगहॅम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.मात्र अदयाप दुचाकींचा शोध लागला नाही.गाडीसोबत पासपोर्टसह रोख रक्कम,कॅमेरा,मॅकबुक व माझे सर्वच सामान चोरीला गेले आहे.याबाबत भारत सरकारने हस्तक्षेप करून मला न्याय मिळवून द्यावा.- योगेश आळेकरी