शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

कोरोनावर 'योग - प्राणायामा'ची मात्रा गुणकारी, शरीरातील ऑक्सिजन प्रमाण वाढून फुप्फुस ठेवा निराेगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:38 IST

कोरोना महामारीबरोबर लढा करायचा असेल तर यासाठी सध्याच्या परिस्थितीत 'योग - प्राणायाम' उपयुक्त ठरत आहे असे निदर्शनास आले आहे.

सुनील बुरुमकर -

कार्लेखिंड :  सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या देशातसुद्धा या महामारीने रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण घाबरलेला आहे. याचे कारण म्हणजे वाढत असलेला संक्रमणाचा वेग. आरोग्य व्यवस्थेवरील ताण, औषधांचा तुटवडा, यासाठी शासनाने लागू करण्यात आलेली जी नियमावली आहे,त्याचे पालन करणे आवश्यक आहे.     कोरोना महामारीबरोबर लढा करायचा असेल तर यासाठी सध्याच्या परिस्थितीत 'योग - प्राणायाम' उपयुक्त ठरत आहे असे निदर्शनास आले आहे. योग - प्राणायाम करणे हे अगदी पुरातन काळापासून चालत आलेली साधना आहे. यामुळे मानवाचे शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते आणि आजच्या घडीला योग - प्राणायाम लाभदायक ठरत आहे. कोरोना आजाराने शरीरातील ऑक्सिजन प्रमाण कमी होते. \त्यामुळे नियमित योग - प्राणायाम केल्यास आॉक्सिजनची मात्रा वाढते. परंतु, हे करताना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

नियमित साधना केल्याचे फायदे  - योग - प्राणायाम भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून चालत आलेली साधना आहे. जर एखाद्याला कोरोनाची बाधा  झाली असेल, ती व्यक्ती यातून लगेच बाहेर येईल.- योग - प्राणायाम हे नियमित केले तर आपले शरीर निरोगी राहते. शरीरातील आॉक्सिजनचे प्रमाण योग्य स्थितीत ठेवते.- फुप्फुस निरोगी ठेवते. ताणतणावापासून दूर ठेवण्यासाठी मदत होते. यापासून एक ना अनेक फायदे होतात.

प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात -योग - प्राणायाम हे सध्ज्च्या काळात उत्तम क्रिया आहे. जे लोक नियमित योग करतात, त्यांना कपालभाती ही क्रिया लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे फुप्फुसातील कार्य क्षमता वाढते. त्याचे शरीर सुस्थितीत राहील. जर एखाद्याला कोरोनाची बाधा झाली असेल, ती व्यक्ती यातून लगेच बाहेर येईल. मानसिक स्थिरता, मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि हे योगाचे प्रकार करणारे असतील तर त्यांना भीती वाटणार नाही. परंतु, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.- वीरेंद्र पवार, याेग प्रशिक्षक

योग - प्राणायाम केल्याने खूप छान फायदा होतो. यामुळे कोरोनाबाधित होण्याची शक्यता कमी असते आणि जर एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाली असेल, तर ती घरी राहूनसुद्धा या आजाराशी लढू शकते. नियमित योग - प्राणायाम केल्यास शरीरातील आॉक्सिजनची मात्रा वाढते. मन नेहमी प्रसन्न राहते. त्याचबरोबर योग्य आहार घेणे आवश्यक आहे.- गौतम लेव्हा, योग प्रशिक्षक

नियमित योगा करणारे म्हणतात-माझे वय ६१ वर्षे आहे आणि गेली २० वर्षे प्राणायाम करीत आहे. याामध्ये कपालभाती प्राणायाम करतो. त्यामुळे दिवसभर उत्साह वाटतो. व्याधी नियंत्रणात राहतात. कोणताही तणाव येत नाही. गायत्री मंत्र, जलनेती, सूर्यनमस्कार या क्रियांपासून खूप फायदा होतो. कोरोनासारख्या आजारापासून बचाव होतो.- कुमार यशवंत जोगळेकर

मी योग - प्राणायाम जवळजवळ २५ वर्षे करीत आहे. त्यामुळे मला कोणताही मोठा आजार नाही. योगामुळे कोरोनापासून लांब आहे. नियमित योग - प्राणायाम करीत असल्याने माझी प्रतिकार शक्ती उत्तम आहे. कोरोनासारख्या परिस्थितीत योग-प्राणायाम लाभदायक ठरत आहे.-शुभांगी माळी 

टॅग्स :Yogaयोगcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस