वीर वाजेकर महाविद्यालयात नॅक री-ॲक्रेडीशन विषयावर कार्यशाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:39 IST2023-09-27T14:38:24+5:302023-09-27T14:39:07+5:30

प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जात असताना कशाप्रकारे तयारी करणे अपेक्षित आहे.

Workshop on NACC Re-Accreditation at Veer Wajekar College | वीर वाजेकर महाविद्यालयात नॅक री-ॲक्रेडीशन विषयावर कार्यशाळा 

वीर वाजेकर महाविद्यालयात नॅक री-ॲक्रेडीशन विषयावर कार्यशाळा 

उरण : फुंडे येथील आयक्यूएसीच्या माध्यमातून नॅक री-ॲक्रेडीशन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालय पुढील वर्षी नॅकला सामोरे जात आहे.महाविद्यालयास 'ए' ग्रेड प्राप्त व्हावी यादृष्टीने महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर व नॅक समन्वयक प्रा.सोपान गोवे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जात असताना कशाप्रकारे तयारी करणे अपेक्षित आहे. याविषयी आणि सात क्रायटीरिया आणि की इंडिकेटर प्रमाणे तयारी कशी करावी याविषयी माहिती दिली. प्रा.सोपान गोवे यांनी डॉक्युमेंटटेशन  कसे करावे,फायलिंग कशा लावाव्यात इतर ऍक्टिव्हिटी अहवाल,कार्यक्रम कशा पद्धतीने दाखवावेत,प्रेझेन्टेशन कसे तयार करावे याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी  डॉ.पी.जी. पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यशाळे दरम्यान अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.यावेळी डॉ.राहुल पाटील, प्राचार्य डॉ.विलास महाले,डॉ.सुजाता पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन सेवक उपस्थित होते.

Web Title: Workshop on NACC Re-Accreditation at Veer Wajekar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.