घोटाळ्यात अडकलेल्यांना कामे दिसत नाहीत- अनंत गीते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:56 IST2019-01-20T00:56:50+5:302019-01-20T00:56:52+5:30
शिवसैनिक आमिषाला बळी न पडता, सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या हिताच्या प्रश्नांसाठी काम करतो.

घोटाळ्यात अडकलेल्यांना कामे दिसत नाहीत- अनंत गीते
माणगाव : शिवसैनिक आमिषाला बळी न पडता, सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या हिताच्या प्रश्नांसाठी काम करतो. मात्र, गेली १५ वर्षे अर्थ, ऊर्जा, पालकमंत्री अशी पदे भूषवणाऱ्यांनी सिंचनातही कोट्यवधींचा घोटाळा केला. घोटाळ्यात अडकलेल्यांना आमची कामे कधीही दिसणार नाहीत, अशी टीका केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते यांनी केली.
माणगाव येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. येथील अशोकदादा साबळे विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित मेळाव्यात खासगी कंपनीने दिलेली अत्याधुनिक वातानुकूलित रुग्णवाहिकेचे लोकार्पण गीते यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर आमदार भरत गोगावले, खासदार राजेंद्र विचारे, किर्लोस्कर कंपनीचे प्रमुख विक्रम किर्लोस्कर, जिल्हाप्रमुख रवि मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
गीते म्हणाले, रायगड लोकसभा निवडणुकीसाठी माझी उमेदवारी जाहीर झाली आणि प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडचे पाणी पळाले. पाटणूस ग्रामपंचायतीला एकरकमी २२ वर्षांचा घरपट्टीचा चेक देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे गीते यांनी सांगितले.