Women 'trust' under one roof, a helping hand in getting justice | महिलांना एकाच छताखाली ‘भरोसा’, न्याय मिळण्यात मदतीचा हात

महिलांना एकाच छताखाली ‘भरोसा’, न्याय मिळण्यात मदतीचा हात

निखिल म्हात्रे

अलिबाग : हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणांत अनेक महिलांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते. योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळण्यासाठी रायगड पोलिसांनी ‘भरोसा’ सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जाणार आहे. मात्र, भरोसा सेलला आणखी सकारात्मकपणे काम करण्याची गरज आहे. कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू केले.

भरोसा सेल हे पीडित महिला व मुले यांच्या तक्र ारी स्वीकारण्यासाठी २४ तास सुरू असणार आहे. रात्री-बेरात्री कुणी महिला आल्यास तिच्या राहण्याची व्यवस्थादेखील करण्यात येते. तसेच १०० या महिला हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारून त्या संबंधित तज्ज्ञांकडे तत्काळ पाठविण्यात येतात. महत्त्वाचे म्हणजे पीडित महिलांकडून प्राप्त झालेल्या तक्र ारींचे वर्गीकरण करून त्यांना त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येते. संबंधित तक्रारकर्त्यांचे समुपदेशन करून आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्थादेखील करण्यात येते. भरोसा सेलमध्ये प्राप्त झालेल्या तक्र ारींमधील पीडित व्यक्तीस न्याय मिळत नाही तोपर्यंत तक्र ार बंद करून कुठलाही एकतर्फी निर्णय घेतला जात नाही. भरोसा सेल अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण तसेच विधिविषयक सेवा, वैद्यकीय सेवा, चाईल्ड हेल्पलाइन, महिला हेल्पलाइन, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, पीडित महिलांचे पुनर्वसन या सेवांचा समावेश आहे.

हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणांत अनेक महिलांना कुठे व कसा न्याय मागावा हेच अनेकदा समजत नाही. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन होणे गरजेचे असते. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशन करण्यात येते. समुपदेशन करूनही त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येतो. यातून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास निश्चित मदत होत आहे. तसेच महिलांनी आत्मनिर्भर राहावे. कारण कुठलाही प्रसंग सांगून येत नाही. विवाह करताना वर-वधू पक्षांकडील योग्य ती माहिती घेऊन निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे जन्मपत्रिका पाहण्याऐवजी वैद्यकीय तपासणी करणे काळाची गरज आहे.
- अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक, रायगड

समुपदेशनाद्वारे तक्र ारींचे निवारण
च्लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी काही वेळा दारोदार फिरावे लागते. बलात्कार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा कुटुंबीयांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे ती शारीरिक व मानिसकरीत्या खचते. हक्क मागणाऱ्या विधवा आणि घटस्फोटाच्या घटनांमधील महिलांचेही असेच होते. तिच्या अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार घडतात.
च्पोलीस स्टेशनला तक्र ार न देताही भरोसा सेलमध्ये तक्र ार नोंदविता येणार आहे. पीडित महिलेला समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधिविषयक सेवा, मानसोपचारतज्ज्ञ, पीडित महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक कायद्यांतर्गत संरक्षण दिले जाते. यातून त्यांचा वेळ, पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल.
च्भरोसा केंद्रात तक्र ारीविकल, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांसोबतच स्थानिक भरोसा सेलमध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक साहाय्यक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकासह कर्मचारीसुद्धा नियुक्त आहेत. महिलांप्रमाणेच ‘भरोसा सेल’ पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे. _हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रात भरोसा सेलचा प्रयोग प्रथमच नागपुरात राबविण्यात आला होता. याला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यात भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे.
 

Web Title: Women 'trust' under one roof, a helping hand in getting justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.