महामार्गावर कारच्या धडकेत महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 00:48 IST2016-03-25T00:48:11+5:302016-03-25T00:48:11+5:30

महामार्गावर टोळ फाट्यावर मुंबई येथून होळी सणाकरिता सापे गावात आलेल्या एका महिलेला भरधाव वॅगनार कारने धडक दिली. या धडकेने महिला गंभीर जखमी झाली असून

The woman is seriously injured in a car on the highway | महामार्गावर कारच्या धडकेत महिला गंभीर

महामार्गावर कारच्या धडकेत महिला गंभीर

दासगाव : महामार्गावर टोळ फाट्यावर मुंबई येथून होळी सणाकरिता सापे गावात आलेल्या एका महिलेला भरधाव वॅगनार कारने धडक दिली. या धडकेने महिला गंभीर जखमी झाली असून तिला मुंबई येथे उपचाराकरिता हलवण्यात आली आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला.
नम्रता रवींद्र सावंत (४२) ही महिला मुंबई येथून आपल्या मूळ गावी सापे येथे होळी सणाकरिता आली असता टोळ फाट्यावर रस्ता ओलांडत असताना रत्नागिरीकडे जाणारी वॅगनार कार क्रमांक एम.एच.४३ ए.टी. ७०८ या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात सदर महिलेच्या हाताला, पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिला प्राथमिक उपचार महाड येथील सरकारी रुग्णालयात केल्यानंतर मुंबई येथे हलवण्यात आले आहे. महामार्गवर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. (वार्ताहर)

Web Title: The woman is seriously injured in a car on the highway