शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मरणाची फिकीर काेणाला...; येथे तर मरण स्वस्त झालंय! अलिबागमध्ये नागरिकांच्या हलगर्जीपणाने कोरोना वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:27 IST

निखिल म्हात्रे -  रायगड/अलिबाग : जिल्ह्यात काेराेना विषाणू फाेफावत असताना नागरिकांना त्याचे देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. संचारबंदीत खरेदीसाठी सूट दिलेली ...

निखिल म्हात्रे - रायगड/अलिबाग : जिल्ह्यात काेराेना विषाणू फाेफावत असताना नागरिकांना त्याचे देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. संचारबंदीत खरेदीसाठी सूट दिलेली आहे. मात्र, १०० रुपयांच्या भाजीपाल्यासाठी नागरिक स्वतःसह समाजाचे आराेग्य धाेक्यात टाकत आहेत. जिल्ह्यात दिवसाला सरासरी १४ रुग्ण सरणावर जात आहेत. असे असतानाही सरकार आणि प्रशासनाचे नियम दरराेज सकाळी सर्वच बाजारपेठांमध्ये पायदळी तुडवले जात आहेत. पाेलीस कारवाई करत आहेत. मात्र, त्यालाही ते जुमानत नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी पहिल्या लाटेत पाेलिसांनी कारवाईचा उगारलेला दंडुकाच बरा हाेता, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

अलिबाग - दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत असून, सध्या तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. अलिबाग तालुक्यात दिवसाला ७३ ते ९० त्या घरात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. या परिस्थितीला नागरिकांचा अति उत्साहीपणा घातक ठरत आहे. या ना त्या कारणाने नागरिक सतत बाहेर फिरत असल्याने कोरोनाची साखळी तोडणे अशक्य झाले आहे. तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३८७ वर पोहोचली आहे. या रुग्णांवर सद्यस्थितीत येथील जिल्हा रुग्णालयात तर काहींवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

अलिबाग तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार २०५ वर पोहोचली आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी २८३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ७ हजार ५३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अलिबागकर चिंतित असून, नव्याने कोरोनाचे ७३ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये सासवणे ०२, अलिबाग शहर ०२, नागाव ०१, पिंपलभाट ०३, धोकोवडे ०३, मांडवा ०३, मानी ०२, चैल ०२, पेझारी ०२ असे अलिबाग तालुक्यात विविध ठिकाणी एकूण ७३ रुग्णांची आज नोंद झाली आहे, तर ११४ जण उपचारानंतर घरी सुखरूप परतले आहेत.

 अनेकजण शासकीय नियम पायदळी तुडवित आहेत. रोज सकाळी ८ ते ११ या वेळेत किराणा व भाजीपाला घेण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत. आपल्याला पुन्हा कधीच भाजी-किराणा मिळणार नाही, अशा पद्धतीने नागरिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी हातभार लावीत आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून सूचना देऊन, दंड करून, कारवाई करूनही जनता प्रशासनाला सहकार्य करायला तयार नाही. जनतेला शिस्त लावण्याच्या प्रयत्नात अधिकारी-कर्मचारी थकून गेले आहेत. अशा चुकांमुळेच अलिबाग तालुक्याचा आकडा वाढत चालला आहे.सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी रात्रंदिवस सेवा करत आहेत. वैद्यकीय सेवा देणारेच आजारी पडताहेत. नगरपरिषदेचे कर्मचारी तरी किती अंत्यविधी करणार, कोरोना योद्धेच काम करताहेत. काही नागरिकांच्या गलथानपणामुळे सर्व व्यवस्थाच कोलमडून पडू शकते.

आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. गर्दीत जाणे टाळावे, गर्दी होईल अशा कार्यक्रम-समारंभांचे आयोजन करू नये आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. कोणाला लक्षणे जाणवत असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने होत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस