शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हा कोणत्या सरकारचा मूर्खपणा, महामार्गावर पेव्हर ब्लॉक; राज ठाकरे यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 06:21 IST

जगात कुठेही गेला तरी रस्ते काँक्रिटचेच असतात असे सांगत किती पैसे खायचे यालाही मर्यादा असतात, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत रविवारी केला.  

रोहा : गेली पंधरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे संताप व्यक्त होत असताना मनसेने रविवारपासून कोकण जागर यात्रेचा प्रारंभ केला. हा कोणत्या सरकारचा मूर्खपणा हे माहीत नाही. या महामार्गावर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. जगात कुठेही गेला तरी रस्ते काँक्रिटचेच असतात असे सांगत किती पैसे खायचे यालाही मर्यादा असतात, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत रविवारी केला.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगा अमित ठाकरे हे यात्रेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग असल्याचे सांगत, सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत मिळत नाही, अशी भावनिक साद घालत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवर ते म्हणाले, जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा. 

कोकणी बांधवांना गेली अनेक वर्षे खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतंही असो, आजचं असो किंवा कालचं.  सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नसते, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबई-पुणे रस्ता देशाला दिशादर्शक१९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई-पुणे रस्ता दोन तासांत पार करता येईल, असा रस्ता तयार करा, असे आवाहन केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता बनवला. तो देशाला दिशादर्शक रस्ता झाला आहे. या रस्त्यानंतरच चांगले रस्ते होऊ लागल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

तुम्ही भूमिहीन ते कोट्यधीशमुंबई-गोवा महामार्ग वेळेत व नीट न करण्याचे कारण म्हणजे अत्यंत कमी किमतीत कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेत आहेत. ज्यावेळी हा रस्ता होईल, त्यावेळी १०० पट किमतीन तुमच्या जमिनी व्यापाऱ्यांना हे लोक विकणार. त्यामुळे कोणीही जमिनी विकू नका, असे आवाहन त्यांनी केले. आपल्याकडे कुंपनच शेत खात असल्याचे सांगत आपलेच लोक आपल्या लोकांकडून कमी किमतीने जमिनी घेऊन जास्त किमतीने व्यापाऱ्यांना विकत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे