शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

तारिक गार्डन दुर्घटनेतील लोकांना न्याय कधी मिळणार? रहिवाशांचा सवाल    

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 12:32 AM

Raigad News : तारिक गार्डन ही इमारत २४ ऑगस्ट रोजी कोसळली. यामध्ये १६ जण मृत्युमुखी पडले, तर ९ जण जखमी झाले. या इमारत दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली. मात्र, तपास यंत्रणा संथ गतीने राबवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले जाते आहे का? असा सवाल तारिक गार्डनमधील रहिवाशांनी केला. ता

दासगाव : महाडमधील तारिक गार्डन इमारत कोसळून जवळपास दोन महिने होत आले, तरी अद्याप या दुर्घटनेचा तपास संथ गतीनेच सुरू आहे. यामुळे तारिक गार्डन रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत असून, तपास यंत्रणेतील अनेक अहवालांना विलंब का लागत आहे, असा सवाल येथील रहिवाशांनी पत्रकार परिषद घेऊन केला.तारिक गार्डन ही इमारत २४ ऑगस्ट रोजी कोसळली. यामध्ये १६ जण मृत्युमुखी पडले, तर ९ जण जखमी झाले. या इमारत दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली. मात्र, तपास यंत्रणा संथ गतीने राबवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले जाते आहे का? असा सवाल तारिक गार्डनमधील रहिवाशांनी केला. तारिक गार्डमधील रहिवाशांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात एक पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे, याचे कथन केले. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या इमारत बांधकाम व्यावसायिक फारुख मेहमूदमिया काझी, युनुस शेख, शशिकांत दिघे, गौरव शहा, बाहुबली धमाणे, दीपक झिंजाड, विवेक डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल असून, अद्याप केवळ चारच आरोपी अटक केल्याचे सांगून, यातील शशिकांत दिघे यांना जामीनही देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे तपसीय अधिकारी शशिकिरण काशीद यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय दबाव असल्याचा आरोपही या रहिवाशांनी केला. 

जखमींना अद्याप मिळाली नाही मदत   या इमारतीच्या अवशेषांचा तपास शासनाच्या व्हीजेटीआयकडून करण्यात आला आहे. तपास करूनही २२ दिवस झाले, तरीही शासकीय निधी उपलब्ध झालेला नाही. शासनाने मृत लोकांना मदत जाहीर केली. मात्र, जखमींना अद्याप मदत केलेली नाही. यामुळे जखमींना आणि बेघर झालेल्या लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. ही केस जलद गतीने चालवून दुर्घटनेतील लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी तारिक गार्डन रहिवाशांनी केली. एका अभिनेत्याच्या मृत्युनंतर संपूर्ण देशात न्यायाची मागणी केली. मात्र, या इमारत दुर्घटनेत १६ लोकांचा प्राण गेला असे असूनही शासन दुर्लक्ष करते, यातूनच शासनाला १६ लोकांच्या जिवाची किंमत नसल्याचे अख्तर पठाण यांनी सांगितले.  

व्हीजेटीआयचा तपासणी अहवाल वेळेत पोहोचणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम सिद्ध करण्यास उपयोगी आहे. म्हणून हा अहवाल लवकर मिळावा.- सुरभी मेहता, वकील 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाRaigadरायगड