शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना पावसाच्या तडाख्यामुळे बुधवारी सुट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 23:08 IST

मंगळवारपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उद्या 'रेड अलर्ट'

School closed due to heavy rainfall in Raigad जमीर काझी, अलिबाग: रायगड जिल्ह्यात मंगळवार सायंकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. वेध शाळेने रेड अलर्टचा इशारा दिला असल्याने बुधवारी, दि. २६ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

शासनाने जारी केलेले परिपत्रक जसेच्या तसे-

ज्याअर्थी, उक्त नमुद अ.क्र. ४ अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरीता अथवा जिल्ह्यातील ठरावीक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे सक्षम अधिकारी सक्षम प्राधीकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क. २ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. आणि ज्याअर्थी, रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत असून तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६/०७/२०२३ रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता, जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दि. २६/०७/२०२३ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक असल्याचे माझे मत झाले आहे. त्याअर्थी, मी डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व दिनांक ०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक २६/०७/२०२३ रोजी सुट्टी जाहीर करीत आहे.

टॅग्स :RaigadरायगडSchoolशाळाRainपाऊस