जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट

By Admin | Updated: March 14, 2016 01:59 IST2016-03-14T01:59:47+5:302016-03-14T01:59:47+5:30

रायगड जिल्ह्यात कडक उन्हाचे चटके असह्य होत असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. पेण तालुक्यात प्रत्यक्षपणे दोन आणि खालापूर तालुक्यात एका

Water shortage crisis in the district | जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट

आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यात कडक उन्हाचे चटके असह्य होत असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. पेण तालुक्यात प्रत्यक्षपणे दोन आणि खालापूर तालुक्यात एका ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याला सुरुवात झाली आहे. येत्या कालावधीत महाड तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून त्या खालोखाल पेण, पोलादपूर आणि अलिबाग तालुक्याचा समावेश टंचाई कृती आराखड्यात आहे.
महाड तालुक्यातील २९४ गावे-वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून त्या खालोखाल पेण (२०० गावे- वाड्या), पोलादपूर (१८२ गावे- वाड्या) . रायगड जिल्ह्यात २०१५-१६ या कालावधीत सरासरी तीन हजार १४२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २८ धरणांमध्ये सुमारे ६९ टक्के पाणी साठा झाला होता. आता त्यामध्ये घट होऊन तो ४६ टक्क्यांवर आला आहे. मोठ्या संख्येने पडणारा पाऊस हा अस्तित्वात असलेल्या धरणात साठविण्यासाठी ती धरणे कमी पडत आहेत. धरणांतून मोठ्या संख्येने गाळ काढून त्यांचे पात्र वाढविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे पेण तालुक्यातील असणाऱ्या हेटवणे धरणातून सुमारे १०० द.ल.घ.मी. पाणी नियोजनाअभावी वाया जात आहे. त्याचे नियोजन केल्यास पेणमध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही. त्याचप्रमाणे अंबा तीर कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. या कालव्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जमीनही भिजणार असून शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत मिळणार आहे. अर्धवट, रखडलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनांना गती देण्याची गरज आहे. टंचाई कृती आराखड्यामध्ये अग्रक्रमांक महाड तालुक्याचा लागत आहे.
महाड तालुक्यामध्ये तीन हजार ४५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळणार आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या सुमारे १५ योजना कार्यान्वित झाल्या आहेत. तालुक्याला खैर धरणातील पाणीपुरवठा होतो. त्याचप्रमाणे १८ गावे २९ वाड्या प्रादेशिक योजनेचा समावेश आहे. वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे या लघु पाटबंधारे प्रकल्पांचाही समावेश महाड तालुक्यात होतो. गेल्यावर्षी महाडमध्ये सुमारे ८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला
होता.130 गावे- वाड्यांचा अलिबाग तालुक्यातील टंचाई कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. मे महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा कमी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांनाच बसल्याचे दिसून येत आहे.पेण तालुक्यात दोन हजार ९३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी शहापाडा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे शहापाडा धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर हेटवणे धरणातील पाणी लीफ्ट करुन शहापाडा धरणात सोडण्यात येते. हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाइपलाइनवर सुमारे ४२ गावांना नळ कनेक्शन जोडले आहेत. रानबाजिरेतून पाणी
पोलादपूर तालुक्यातही तीन हजार ७१२ मिलीमीटर पाऊस झाला होता. अख्ख्या पोलादपूर तालुक्याची तहान रानबाजिरे धरणाच्या पाण्यातून भागविली जाते. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पोलादपूरला गेल्या वर्षी चार टँकरची गरज भासली होती.एमआयडीसीमार्फत पाणी
अलिबाग तालुक्यामध्ये दोन हजार १३१ मि.मी. पाऊस झाला होता. तीनवीरा धरण, उमटे धरण, श्रीगाव धरण आणि कामार्ले धरण आहे. यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे शहराची तहान एमआयडीसीमार्फत भागविली जाते. कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कार्ले हे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. सप्टेंबर २०१५ मध्येच पाण्याचे नियोजन करावे याबाबतचे पत्र संबंधित विभागांना देण्यात आले होते. त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले. पेण तालुक्यात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. पेण तालुक्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने यंदा मार्च महिन्यात काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. टंचाई असणाऱ्या ठिकाणी मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येईल.
-अरविंद टोरो, कार्यकारी अभियंता

Web Title: Water shortage crisis in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.