भात पिकासाठी पाणी व्यवस्थापनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:47 PM2018-10-16T22:47:45+5:302018-10-16T22:48:23+5:30

- जयंत धुळप अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात, आॅगस्ट महिन्यात भात व अन्य पीक वाढीच्या अवस्थेत असताना पावसाअभावी पिकावर ...

Water management needs for rice crop | भात पिकासाठी पाणी व्यवस्थापनाची गरज

भात पिकासाठी पाणी व्यवस्थापनाची गरज

googlenewsNext

- जयंत धुळप


अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात, आॅगस्ट महिन्यात भात व अन्य पीक वाढीच्या अवस्थेत असताना पावसाअभावी पिकावर ताण आला, त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पिकांचा बचावासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी व सद्यस्थितीत उपलब्ध पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर शेताच्या बांधातील खेकड्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचा सल्ला कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कोकणातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.


सध्या उपलब्ध पाण्यातून भात पिकांना दोन ते तीन दिवसांच्या अंतराने संरक्षित पाणी देणे गरजेचे आहे. पर्जन्यखंडामुळे लष्करीअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने, त्याबाबतही कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार कारवाई करावी, असेही सूचवण्यात आले. कोकणातील पाच जिल्ह्यांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २ जूनला, रायगडमध्ये ४ जून, ठाण्यामध्ये ८ जून, तर पालघर मध्ये १० जून रोजी पावसाला सुरु वात झाली.
राज्य कृषी विभागाकडून उपलब्ध आकडेवारीवरून पर्जन्यमानाची मीमांसा ही जिल्हास्तरीय सरासरी पर्जन्यमानापासून केली असून, गाव किवा तालुका पातळीवर यापेक्षा वेगळी परिस्थिती असू शकते, अशी माहिती मर्दाने यांनी दिली आहे.


कोकणात सर्व जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै महिन्यांमध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या १३७ टक्के आणि १०८ टक्के पाऊस झाला. या दोन महिन्यांमध्ये पर्जन्यमान चांगले असल्यामुळे भात, नागली आणि इतर पिकांची लागवड वेळेवर झाली आणि वाढ समाधानकारक होती; परंतु आॅगस्ट महिन्यामध्ये कोकणात एकूण सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पर्जन्यमान झाले, त्यामुळे पीकवाढीवर काहीसा परिणाम झाला.


सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये अनुक्र मे ३५, ३३ आणि २६ टक्के पर्जन्यमान झाले, त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यात हळव्या भाताचे दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाअभावी उत्पादन धोक्यात आले ेहोते. त्यामुळे भात खाचराची बाधबंधिस्ती खेकड्याच्या प्रदुर्भावामुळे बांध फुटून नये, याची काळजी घ्यावी. खेकड्यांच्या बंदोबस्तासाठी एक किलो शिजलेल्या भातामध्ये ७५ टक्के पाण्यात मिसळणारी आॅसिफेट पावडर ७५ ग्रॅम टाकून विषारी अमिष तयार करावे व प्रत्येक बिळाच्या आत तोंडाशी एक गोळी ठेवावी, असा सल्ला या वेळी देण्यात आला.


पर्जन्यखंडामुळे लष्करीअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता
पावसाचा खंड पडल्यामुळे लष्करीअळी या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यासाठी भात खाचरात एकरी तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत, जेणेकरून पक्षी या अळ्या नष्ट करतील, तसेच सकाळी किंवा संध्याकाळी भात खाचरात जाऊन भाताचे चूड उघडून पाहावेत, यामध्ये अळी किंवा कोष आढळल्यास डायक्लोरव्हास ७६ डब्लू.एस.सी. १.३ मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारावे, असा सल्ला कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी शेतकºयांना दिला आहे.

भात पिकांना पाणी गरजेचे
पावसाचे प्रमाण कमी असल्याने भात खाचरालगतचा नाला, ओहळ, ओढा इत्यादीना बंधारा घालून या पाण्याचा उपयोग भात खाचरास संरक्षित पाणी देण्यास करावा. जलयुक्त शिवारात साठवलेल्या पाण्याचा उपयोग भातशेतीच्या संरक्षणासाठी करावा. निमगरच्या आणि गरव्या भात जाती दाणे भरण्याच्या व फुलोरा स्थितीत असल्याने ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी या प्रकारच्या भात पिकांना दोन ते तीन दिवसांच्या अंतराने संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी.

Web Title: Water management needs for rice crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.