शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये लाखो लीटर पाणी वाया

By admin | Updated: November 18, 2016 04:09 IST

नवीन पनवेलमधील पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने येथील झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

पनवेल : नवीन पनवेलमधील पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने येथील झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. लाखो लीटर पाणी वाहून गेल्याने दिवसभर पनवेलच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. अनेकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे भिजल्याने गुरुवारी रात्रीच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. गुरुवारी पनवेल शहरात सायंकाळी पाणीपुरवठाही होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे आता शुक्र वारी सकाळी पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरु वारी सकाळी ११.३० च्या दरम्यान नवीन पनवेलमधील रेल्वे रुळाजवळ असलेल्या पंचशीलनगरच्या बाजूला असलेली पाइपलाइन फुटली. पाण्याचा वेग इतका होता की, बाबू पवार यांच्या झोपडीची भिंत फोडून पाणी आत शिरले. त्यानंतर काही समजायच्या आत संपूर्ण वसाहतीत पाणीच पाणी झाले. झोपडपट्टीतील अनेकांचे संसार पाण्यात गेले. घरातील अन्नधान्य, कपडे, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भिजल्या. काही घरांमध्ये केवळ लहान मुले अथवा ज्येष्ठ व्यक्तीच असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हरिश्चंद्र बनकर यांच्या घरात यावेळी त्यांची ८० वर्षांची आई होती. घरात १ फुटापेक्षा जास्त पाणी शिरल्याने सर्वच सामान पाण्याखाली गेले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ही जलवाहिनी २५-३० वर्षे जुनी आहे. गुरुवारी सेक्टर ४ मधील दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतले होते. दोन ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू होते. अचानक पंचशीलनगर येथील जलवाहिनी फुटल्याने शटडाऊनचे काम थांबवण्यात आले आणि एमजेपीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पंचशीलनगरमध्ये धाव घेतली. जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. जलवाहिनीचे काम उशिरापर्यंत करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न जीवन प्राधिकरणातर्फे केला जात आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे उप अभियंता एस.डी. दशोरे यांनी सांगितले. (वार्ताहर)