महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By Admin | Updated: May 2, 2016 01:07 IST2016-05-02T01:07:44+5:302016-05-02T01:07:44+5:30

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभास रायगडचे पालकमंत्री

Various programs in the district on the occasion of Maharashtra Day | महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

अलिबाग:महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभास रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता हे गैरहजर राहिल्याने अखेर रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी.मलीकनेर, नूतन अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर विशेष कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये खोपोलीचे पोलीस निरीक्षक सावता शिंदे, पोलीस हवालदार (मुख्यालय) श्रीकांत म्हात्रे, माणगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, पोलीस निरीक्षक (अलिबाग) तुकाराम पवळे, दिघी सागरी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोगले, आदर्श तलाठी पुरस्कार विजेते सी.एस. राऊत, यानंतर बॉम्ब शोध पथक, अग्निशमन दल, पोलीस दल, होमगार्ड, महिला पोलीस पथक, पोलीस दलाचे बँड पथक आदी पथकांनी संचलन करु न मानवंदना दिली. (विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र दिनाकडे ग्रामपंचायत सदस्यांची पाठ
नागोठणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापन दिन शहरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील सर्व शाळा, पोलीस ठाणे, वन कार्यालय याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य कार्यक्र म ग्रामपंचायत कार्यालयासमोर संपन्न झाला. सरपंच प्रणय डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीमध्ये निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या सतरा आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला सतरापैकी केवळ तीनच सदस्य उपस्थित होते. मात्र चौदा सदस्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

सांस्कृतिक कार्यक्रम
रेवदंडा : रेवदंडा परिसरात महाराष्ट्र दिन उत्साहात पार पडला. ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली मोरे यांनी ध्वजारोहण केले. याप्रंसगी ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. पारनाका येथे नवचैतन्य मंडळातर्फे महापूजेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नगरसेवकांची पाठ
कर्जत : कर्जत तालुक्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. कर्जत नगरपरिषदेच्या प्रांगणातील ध्वजारोहण प्रसंगी महिला नगरसेवकांची उपस्थिती होती मात्र नगरसेवकांनी पाठ फिरविल्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. कर्जतमध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापन दिन कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. कर्जत नगरपालिकेच्या प्रांगणात नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयातील ध्वजारोहण आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातील ध्वजारोहण प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख यांच्या हस्ते झाले.

Web Title: Various programs in the district on the occasion of Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.