शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोविडमध्ये उत्पादक संघटनेचे योगदान मोलाचे, प्रतिमा पुदलवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 23:16 IST

Pratima Pudalwad : महाड उत्पादक संघटनेच्या वतीने ऑगस्ट महिन्यात औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरचा समारोप आणि या सेंटरमध्ये अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यसेवक आणि इतर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

महाड : शासनाला महाड उत्पादक संघटनेसारख्या संस्थांची माणुसकीच्या भावनेतून मिळालेली मदतच कोरोनाचा प्रतिबंध करण्यास मोलाची ठरली, असे गौरवोद्गार महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी एमएमए कोविड सेंटर येथे बोलताना काढले. तर महाड औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखानदारांच्या सहकार्यानेच कोविड सेंटरचे आव्हान पेलण्यात एमएमए यशस्वी झाल्याचे या संस्थेचे चेअरमन संभाजी पाठारे यांनी सांगितले.महाड उत्पादक संघटनेच्या वतीने ऑगस्ट महिन्यात औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरचा समारोप आणि या सेंटरमध्ये अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यसेवक आणि इतर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विशेष अतिथी म्हणून महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड या बोलत होत्या. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे, एमएमएचे अध्यक्ष संभाजी पाठारे, देवा ड्रिलचे चेअरमन मोहनकुमार, केएसएफचे संचालक नीलेश लिमये, नायब तहसीलदार बी.एन. कुडाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. एजाज बिराजदार, सेंटरच्या इन्चार्ज डाॅ. भाग्यरेखा पाटील, डाॅ. फैसल देशमुख, डाॅ. आदित्य म्हामुणकर आदी  उपस्थित होते.

शेकडो रुग्णांना दिलासासंभाजी पाठारे यांनी सुरुवातीच्या काळात हे सेंटर उभारण्यासाठी खर्च केलेला लाखोंचा खर्च पाण्यात जाईल, अशी साशंकता होती. मात्र, संघटनेचा हेतू प्रामाणिक असल्याने आरोग्यसेवक, खासगी डाॅक्टर्स आणि स्वयंसेवकांच्या मदतीनेच शेकडो रुग्णांना दिलासा देण्याचे काम या सेंटरमधून झाल्याचे सांगून, कोरोना रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने तूर्तास हे सेंटर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संमतीनुसार ३१ डिसेंबरपासून बंद करण्यात येणार असल्याचे पाठारे यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस