शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 00:49 IST

मान्यवरांनी वाहिली आदरांजली; सावित्री नदीत आज करणार विसर्जन

अलिबाग : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी अलिबागमध्ये आणण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सजवलेल्या मंडपामध्ये कलश ठेवण्यात आला. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसह नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन भारताच्या महान नेत्याला आदरांजली वाहिली.माजी पंतप्रधान यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दिल्लीमध्ये निधन झाले, त्यामुळे देश शोकसागरात बुडाला होता. सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. वाजपेयी यांच्या कार्यशैलीने देशासह आंतरराष्ट्रीय राजकारणात छाप पाडली होती. देशातील नागरिकांना त्यांच्या अस्थींचे दर्शन घेता यावे, यासाठी त्यांचा अस्थिकलश प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आला. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतून अस्थिकलश आणून ते प्रत्येक जिल्हाध्यक्षांच्या स्वाधीन केले.अलिबाग येथे दुपारी १२च्या सुमारास वाजपेयींचा अस्थिकलश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणला. शहरातील शिवाजी चौकातील काशी विश्वेश्वर मंदिराच्या समोर मंडप उभारण्यात आला होता. याठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश आणि फोटो ठेवण्यात आला होता.रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे, यासाठी रोहे, मुरु ड, पाली, म्हसळा, महाड अशा विविध ठिकाणी अस्थिकलश नेण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग-मुरु ड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता महाडच्या सावित्री नदीमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीalibaugअलिबागBJPभाजपा