शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

उरणचा वीजनिर्मिती प्रकल्पच गॅसवर; अपुऱ्या वायूपुरवठ्यामुळे सहापैकी चार संच बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 09:55 IST

जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ मध्ये उरणचा वायू विद्युत प्रकल्प उभारला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे.

- मधुकर ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कउरण : ऐन उन्हाळ्यात वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांची घामाने भिजून काहिली होत असताना वीजटंचाईचे चटके सामान्यांना सोसावे लागत आहेत. उरणच्या बोकडविरा  ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या विद्युत केंद्राला (जीटीपीएस) गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशा प्रमाणात गॅसपुरवठाच होत नाही. त्यामुळे प्रकल्पातील सहापैकी चार विद्युतनिर्मिती संच बंदच ठेवावे लागत असल्याने ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची क्षमता निम्म्याहून अधिक घटली आहे. या घटलेल्या वीज निर्मितीमुळे राज्यातील वीज तुटवड्यात आणखीनच भर पडली आहे.

जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ मध्ये उरणचा वायू विद्युत प्रकल्प उभारला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे. मात्र, सुरुवातीपासूनच केवळ २.६ ते २.८ क्युबिक मीटर या सरासरीनुसारच गॅसचा पुरवठा होत होता. त्यानंतर मागील काही वर्षांपासून वीजनिर्मितीच्या दोन संचासाठी २.५ दररोज क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे. मात्र, फक्त सरासरी १.०५ क्युबिक मीटर गॅसचा पुरवठा गेल कंपनीकडून होत आहे. मागील काही वर्षांपासून आवश्यकतेनुसार गॅसपुरवठा होत नसल्याने सहापैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे ६७२ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पातून आता दररोज २५० ते ३०० मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती होत आहे.       

वीजनिर्मितीचे संच सातत्याने बंद ठेवावे लागत असल्याने कोट्यवधी खर्चून उभारलेले हे संच भंगारात जाऊन नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या केंद्राचे विस्तारीकरण करण्याची योजनाही आखली होती. यामुळे प्रकल्पाची क्षमता वाढून १२२० मेगावॅटपर्यंत पोहचणार होती. मात्र १२२०  वीजनिर्मितीच्या या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला आहे.

केंद्र, ओएनजीसी ठरवते धोरणवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी  शंभर टक्के गॅसपुरवठा झाल्यास सध्याची प्रकल्पाची क्षमतेप्रमाणे ६०० मेगावॅटची वीजनिर्मिती करणे फारसे अवघड नाही. मात्र, गॅसचा किती प्रमाणात पुरवठा करावा याबाबतचे धोरण केंद्र सरकार आणि ओएनजीसी व गेल या कंपन्यांच्या माध्यमातून ठरत असल्याने त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणेच प्रकल्पाला सध्या गॅसपुरवठा केला जातो. त्यामुळे अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळेच वीजनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

१.०५ इतकाच गॅस पुरवठागेल कंपनीकडून आवश्यकतेनुसार जीटीपीएसला याआधीही कधीही गॅसपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीचे सहापैकी चार संच याआधीच बंद पडले आहेत. उर्वरित सुरू असलेल्या वीजनिर्मितीच्या दोन संचासाठी आवश्यक असणाऱ्या २.५ क्युबिक मीटरऐवजी फक्त १.०५ इतकाच गॅस पुरवठा होत आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्राची क्षमता २५०-३०० मेगावॅटपर्यंत घसरली आहे. त्यामुळे  या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला असल्याची माहिती जीटीपीएसचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज