Uran: उरणचा अग्निवीर प्रज्वल टावरी याचे जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 16:23 IST2023-06-19T16:22:03+5:302023-06-19T16:23:46+5:30

Uran:  देशसेवेसाठी स्थापन केल्या अग्निवीर इंडियन आर्मीमध्ये दाखल होऊन सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेल्या उरण तालुक्यातील रावे गावचा प्रज्वल टावरी या युवकाचे  गावकऱ्यांनी रविवारी (१८) ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले.

Uran's Agniveer Prajwal Tawari is welcomed with cheers | Uran: उरणचा अग्निवीर प्रज्वल टावरी याचे जल्लोषात स्वागत

Uran: उरणचा अग्निवीर प्रज्वल टावरी याचे जल्लोषात स्वागत

- मधुकर ठाकूर 
उरण :  देशसेवेसाठी स्थापन केल्या अग्निवीर इंडियन आर्मीमध्ये दाखल होऊन सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेल्या उरण तालुक्यातील रावे गावचा प्रज्वल टावरी या युवकाचे  गावकऱ्यांनी रविवारी (१८) ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले.

देशसेवेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अग्निवीर इंडियन आर्मीमध्ये सहा महिन्यांचे ट्रेनिंग पुर्ण करुन प्रज्वल टावरी हा युवक रविवारी (१८) प्रथमच आपल्या रावे या जन्मगावी दाखल झाला आहे. रावे गावात त्यांच्या स्वागतासाठी ठिक ठिकाणी बँनर लावण्यात आले आहेत. आबालवृद्धांनी विशेष करून महिलांवर्गानी भारत माता की जय,जय जवान जय किसान,जय शिवराय अशा प्रकारच्या घोषणा देत फटाक्यांच्या आतषबाजीने ढोल ताशाच्या गजरात गावात मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात स्वागत केले.यावेळी रावे गाव कमिटीचे अध्यक्ष राजा महादेव पाटील, रामभाऊ टावरी,  संतोष ठाकूर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी गावातील सुवासिनी महिलांनीही प्रज्वल टावरी याच्यावर फुलांची उधळण करीत ओवाळणी केली.

Web Title: Uran's Agniveer Prajwal Tawari is welcomed with cheers