उरण-जेएनपीटी बनला समस्यांचा महामार्ग, खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 03:20 IST2018-08-28T03:19:41+5:302018-08-28T03:20:02+5:30
जेएनपीटी हा देशातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग. अनुक्रमे १७ व २७ किलोमीटरच्या दोन्ही महामार्गांची प्रचंड दुरवस्था झाली आहे

उरण-जेएनपीटी बनला समस्यांचा महामार्ग, खड्डेच खड्डे
रायगड - जेएनपीटी हा देशातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग. अनुक्रमे १७ व २७ किलोमीटरच्या दोन्ही महामार्गांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रोडच्या दोन्ही बाजूला कंटेनर उभे केले जात आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. रोडच्या बाजूच्या गटारांची दुरवस्था झाली आहे.
करळ उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे. काही ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू आहे त्या ठिकाणी वाहतूककोंडीचे प्रमाण अधिक आहे. उरण परिसरातील तीन लाख नागरिकांना वर्षानुवर्षे गैरसोयींना सामोरे जावे लागत असून महामार्गाच्या वास्तव स्थितीचा लोकमतचे छायाचित्रकार संदेश रेणोसे व भालचंद्र जुमलेदार यांनी घेतलेला आढावा...