उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 09:34 IST2025-11-03T09:33:37+5:302025-11-03T09:34:47+5:30

याला रेड रॅट स्नेक या नावानेही ओळखले जाते, असे सर्पमित्राचे म्हणणे आहे

uran corn snake in India without visa hiding in a tire container from abroad | उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून

उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून

लाेकमत न्यूज नेटवर्क, उरण: उरण येथील हिंद कंटेनर टर्मिनलमध्ये विदेशातून आलेल्या एका टायरच्या कंटेनरमध्ये ‘कॉर्न स्नेक’आढळला. हा उत्तर अमेरिकन खंडातील विदेशी (Exotic) प्रजातीचा साप आहे. याला रेड रॅट स्नेक या नावानेही ओळखले जाते, असे सर्पमित्राचे म्हणणे आहे.

हिंद कंटेनर टर्मिनलमध्ये परदेशातून कंटेनर आयात करण्यात आला आहे. जेएनपीए बंदरात आयात केलेला कंटेनरच्या तपासणीदरम्यान एका टायरमध्ये कामगारांना नारंगी रंगाचा, आकर्षक पट्टेरी साप दिसला. त्यांनी या बाब व्यवस्थापनाच्या नजरेत आणून दिली. त्यानंतर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.  सर्पमित्र स्वप्निल म्हात्रे, जयेश गायकवाड यांनी, यार्डमध्ये जाऊन पाहणी केली असता हा बिनविषारी साप असून, मानवाला कोणताही धोका नसतो. या जातीचे साप प्रामुख्याने पाळीव स्वरूपात ठेवले जातात. तथापि, भारतात परदेशी प्रजातींची उपस्थिती पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने चिंताजनक मानली जाते. कारण ते इथल्या स्थानिक प्रजातींसाठी प्रतिकूल ठरू शकतात.

‘त्याची घरवापसी गरजेची’

परदेशी सापाला त्याच्या मूळ ठिकाणी म्हणजे जेथून आला तिथे पाठविणेच योग्य असते. सर्पमित्रांनी घटनास्थळी जाऊन साप पकडून वनविभागाकडे  दिले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जी. कोकरे याबाबत पुढील कार्यवाही करत आहे.

Web Title : उरण: बिना वीजा का 'कॉर्न स्नेक' कंटेनर में मिला!

Web Summary : उरण के हिंद टर्मिनल में एक कंटेनर में एक कॉर्न स्नेक मिला। यह विदेशी प्रजाति का गैर-विषैला सांप है। पालतू होने की संभावना है, इंसानों के लिए खतरा नहीं है, लेकिन पारिस्थितिक संतुलन के बारे में चिंताएं बढ़ाता है।

Web Title : Uran: Corn Snake Found in Container, A Visa-Free Foreigner!

Web Summary : A corn snake, a non-venomous exotic species, was discovered in a container at Uran's Hind Terminal. The snake, likely a pet, poses no threat to humans but raises concerns about ecological balance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप