- वैभव गायकरपनवेल - पनवेल तालुक्यात मंगळवार दि.6 रोजी तसेच बुधवार दि.7 रोजी अवेळी पावसाने अनेकांची हिरमोड केली.सध्याच्या घडीला लग्नसराई सुरु असल्याने अनेक लग्न समारंभाना याचा फटका बसला तसेच वादळी वाऱ्यामुळे पालिका गड्डीत तब्बल 16 झाडे उन्मळून पडली.या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास मुसळधार पावसाळामुळे तालुक्यातील हळदी समारंभांना फटका बसला.अचानक जोरात पाऊस आल्याने अनेक मंडपात पाणीच पाणी झालेले पहावयास मिळाले.दुसऱ्या दिवशी देखील अशिच परिस्थिती पहावयास मिळाली.दुपारीच जोरदार पाऊस बरसल्याने अनेक इमारतींचे पत्रे देखील उडाले.या पावसात पनवेल 2,कळंबोली 3,कामोठे 4,खारघर 7 अशी 16 झाडे कोसळली.ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत.