दोन संशयित बोटी कोस्टगार्डने पकडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:17 IST2018-10-28T23:17:09+5:302018-10-28T23:17:42+5:30
मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रामध्ये कोस्टगार्डने दोन संशयित बोटी पकडल्या आहेत. संशयित बोटींमुळे पुन्हा मोठा हल्ला होण्याच्या भीतीने सर्वच हादरून गेले होते.

दोन संशयित बोटी कोस्टगार्डने पकडल्या
अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रामध्ये कोस्टगार्डने दोन संशयित बोटी पकडल्या आहेत. संशयित बोटींमुळे पुन्हा मोठा हल्ला होण्याच्या भीतीने सर्वच हादरून गेले होते. या दोन्ही बोटी गोवा येथील असल्याचे समोर आले आहे. कोस्टगार्डने बोटीतील कर्मचाऱ्यांना मुरुड पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे सूत्रांनी सांगितले. या बोटी घातपात घडवण्यासाठी आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु यातील एक बोट मासेमारी करण्यासाठी येथे आली होती. ती भर समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्या बंद पडलेल्या बोटीला टोइंग करून नेण्यासाठी दुसरी बोट कोर्लई येथे दाखल झाली. या बोटीवर एलईडी फिशिंगसाठी वापरण्यात येणारे लाइट होते. एलईडी लाइट फिशिंग बंद असल्याने या बोटीला कोस्टगार्डने अडवले. त्यानंतर त्यांनी मुुरुड पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती समोर येत आहे. सदरची घटना २६ आॅक्टोबरला दुपारी घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रायगडचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त अभयसिंह शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.