शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

भारतीय तटरक्षक दलाच्या  सेवेत  दोन अत्याधुनिक बोटी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 5:39 PM

भारतीय तटरक्षक दलाच्या  सेवेत आज दोन अत्याधुनिक बोटी विधीवत दाखल झाल्या. मुरुड जंजीरा येथील दिघी  पोर्ट येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला.

ऑनलाइन लोकमत जंजिरा, दि. 19 - भारतीय तटरक्षक दलाच्या  सेवेत आज दोन अत्याधुनिक बोटी विधीवत दाखल झाल्या. मुरुड जंजीरा येथील दिघी  पोर्ट येथे हा शानदार सोहळा संपन्न झाला.भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक के. आर. नौटीयाल यांच्याहस्ते या बोटी सेवेत दाखल करुन घेण्यात आल्या. यावेळी  पश्चिम विभागाचे उप महानिरीक्षक मुकूंद गर्ग, कमांडंट अरूण सिंग,  जे. एल .मेहता यांच्यासह अन्य   मान्यवर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तटरक्षक दलात दाखल झालेल्या या बोटींचे वैशिष्ट्ये याप्रमाणे-या बोटीची लांबी  27.42 मीटर्स असून वजन 136 टन आहे.  एल ॲण्ड टी शिप बिल्डींग चेन्नई येथे या बोटींची बांधणी झाली असून  20 नॉटस मध्ये 500 नॉटीकल मैल या वेगाने या बोटी प्रवास करु शकतात.  हा वेग 45 नॉट्स पर्यंतही वाढविण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक संचार आणि नाविक सुविधांनी सज्ज असलेल्या या बोटींवर 12.7 मीमी मशिन गन्सनेही सज्ज आहे. वेगवान दळणवळण, किनाऱ्याच्या अगदी जवळून गस्त घालणे, शोध कार्य, सुटकेसाठीचे कार्य आणि सागरी सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा वैशिष्ट्यांनी या बोटी सज्ज आहेत.  या बोटींमुळे राज्याच्या 720 कि.मी लांबीच्या समुद्र किनाऱ्याची सागरी सुरक्षा अधिक बळकट झाली आहे.  त्यामुळे अवैध वाहतुक, मासेमारी, तस्करी  अशासारख्या अवैध कृत्यांना आळा घालणे शक्य होणार आहे.

 या दोनही बोटी  (सी 433 व सी 434)  या मुरुड जंजीरा येथील तटरक्षक दलाच्या  प्रशासकीय नियंत्रणाखाली असतील आणि तेथून त्या कार्यान्वित असतील.  डेप्युटी कमांडंट जसप्रित सिंग धिल्लों आणि जाहिद आफ्रान  हे या बोटींचे नियंत्रक अधिकारी आहेत.या कार्यक्रमाला अलिबाग येथील एन.सी.सी.चे विद्यार्थी, भारतीय तटरक्षक दलाचे जवान, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.