शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात ३५ जखमी, कंटेनरची दोन मिनी बसला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 00:51 IST

माणगाव पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर माणगावनजीक ढालघर फाटा येथे रविवारी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन टेम्पोट्रॅव्हलमधील ३५ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी सात जणांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.अपघातग्रस्त कंटेनर क्र. एम.एच ४६ ए.आर. ९४५९ वरील चालक कंटेनर हा मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याकडून मुंबई बाजूकडे जात होता. कंटेनरचालक बेदरकारपणे वाहन चालवून माणगाव ढालघर फाटा जवळ आला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चुकीच्या बाजूला जाऊन माणगावकडून महाडकडे जाणाऱ्या मिनी बस क्र. एम एच ०८ ई ९२६१ ला धडकला. ही बस जोरात पाठीमागे जाऊन एम एच ४३ एच ४९४१ या मिनी बसवर आदळली. अपघातात दोन्ही मिनी बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी प्रियांका बैकर (४०), कृष्णा बैकर (५५), प्रीती रेमजे (४०), अंजली शिगवण (३५), जगदीश गोवळे (२४), गजानन गोवळे (४५), प्रथमेश खानविलकर (२८) या सात जणांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार सायगावकर करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात