हेटवणेतील पाणी पळवण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:09 AM2019-06-15T01:09:12+5:302019-06-15T01:09:29+5:30

पेणमध्ये धैर्यशील पाटील यांची पत्रकार परिषद : सिंचनाचे पाणी देण्यास विरोध

trying to stolen water in hetvane | हेटवणेतील पाणी पळवण्याचा डाव

हेटवणेतील पाणी पळवण्याचा डाव

Next

पेण : पेणच्या हेटवणे धरणातील शेतीसाठी आरक्षित असलेले सिंचनाचे पाणी सिडकोने पळविण्याचा डाव रचला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या बाबतचे मागणी पत्र कार्यकारी अभियंता हेटवणे मध्यम प्रकल्प कामार्ली कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे.
सिडको क्षेत्रातील घरगुती पिण्याच्या पाणी वापरासाठी कायमस्वरूपी हेटवणे सिंचनाचे आरक्षित असलेले ७६.८३ दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी ५६.८३ दशलक्ष घनलीटर पाणी सिडकोसाठी आरक्षित करावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सिंचनासाठी फक्त २० दशलक्ष पाणी उपलब्ध होणार आहे.

पेणमधील शेतकरी व नागरिकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी शुक्रवारी येथील कार्यालयात भेट देऊन सिंचनाचे पाणी सिडकोला देणार नाही, अशी भूमिका घेऊन भविष्यात यासाठी संघर्ष उभा करण्याचा इशारा दिला आहे.
पिण्याच्या पाण्याच्या निमित्ताने नवी मुंबई एसईझेड प्रकल्पामधील औद्योगिक वसाहतींना शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी कदापि घेऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. पेणमधील हेटवणे धरणाचे एकूण पाणी क्षेत्र १४७.०० दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा १४४.९८ इतका आहे. यापैकी सिडकोसाठी यापूर्वी पिण्याचे पाणी दिले असून ते वगळता धरणात ८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सिंचनासाठी आरक्षित ठेवलेला आहे. यातून पेणच्या खारेपाटातील वाडी-वस्त्यासाठी २.०० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. उर्वरित ७६.८३ दशलक्ष घनमीटर सिंचनाच्या शिल्लक पाणीसाठ्यातून सिडको प्रशासनाने १६० एमएलडी पिण्याच्या पाण्यासाठी मागणी केलेली आहे. म्हणजे ५६.८३ दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी केल्याने सिंचनासाठी फक्त २० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित राहणार असल्याने पेणमधील सिंचन क्षेत्रातील ५ हजार ६०० हेक्टर शेती कालव्यांच्या रखडलेल्या कामामुळे नाहीशी होणार आहे. सिडकोच्या मागणीमुळे शेतकºयांवर अन्याय होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

वास्तविक सिडकोने बाळगंगा हे धरण बांधलेले आहे; परंतु त्याचे २० टक्के काम होणे बाकी आहे. यासाठी ७० ते ८० कोटी रुपयांचा खर्च होणार असून ते काम पूर्ण करून हेटवणे धरणाच्या क्षमतेइतकेच पाणी बाळगंगा धरणामध्ये उपलब्ध होणार आहे. असे असताना सिडको व शासनाचा जलसंपदा विभाग शेतीसाठी आरक्षित असलेले हेटवणे सिंचनाचे पाणी मागणी करून शेतकरीवर्गावर मोठा अन्याय करीत असल्याचे नवे संकट या निमित्ताने उभे राहिलेले आहे. या सिडकोच्या मागणीसाठी २२ एप्रिल २०१९ रोजी प्रधान सचिव जलसंपदा यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत सिडको उपाध्यक्ष व व्यवस्थापकी संचालक, सिडको कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग, सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता हेटवणे मध्यम प्रकल्पाकडे १६० एमएलडी पिण्याचे पाणी सिडको प्रशासनाकडून मागणी करण्यात आल्याचे संपूर्ण दस्तावेज पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आले.

च्हेटवणे धरणाचे एकूण पाणी क्षेत्र १४७.०० दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा १४४.९८ इतका आहे. यापैकी सिडकोसाठी यापूर्वी पिण्याचे पाणी दिले असून ते वगळता धरणात ८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सिंचनासाठी आरक्षित ठेवलेला आहे. तर पेणच्या खारेपाटातील वाडी-वस्त्यासाठी २.०० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे.
 

Web Title: trying to stolen water in hetvane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.