शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

महामानवाला त्रिवार अभिवादन; चवदार तळे सत्याग्रहाचा ९१वा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 1:50 AM

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह केल्याच्या घटनेचा मंगळवारी ९१वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसागर लोटला होता.

महाड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह केल्याच्या घटनेचा मंगळवारी ९१वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसागर लोटला होता. चवदार तळे तसेच क्रांतिस्तंभावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती.केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, प्रदेश काँँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आदींंनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. डॉ. आंबेडकर सभागृहात बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने श्रमणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेबांचे सत्याग्रह चळवळीतील सहकारी दलितमित्र सुुुरबानाना टिपणीस यांच्या निवासस्थानासमोर या सैनिक दलातर्फे मानवंंदना देण्यात आली.आ. भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे आदींनी महामानवाला अभिवादन केले.

टॅग्स :Raigadरायगड