आकाशगंगा पर्यटकांच्या भेटीला
By Admin | Updated: May 11, 2017 02:06 IST2017-05-11T02:06:07+5:302017-05-11T02:06:07+5:30
आकाशातील सूर्य,चंद्र,ग्रह, तारे याची माहिती सर्वसामान्य लोकांना फक्त पुस्तकांमधून मिळत होती, परंतु आता माथेरानमध्ये

आकाशगंगा पर्यटकांच्या भेटीला
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : आकाशातील सूर्य,चंद्र,ग्रह, तारे याची माहिती सर्वसामान्य लोकांना फक्त पुस्तकांमधून मिळत होती, परंतु आता माथेरानमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ही माहिती दुर्बिणीच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे आणि ते फक्त माथेरान गिरीस्थान नगरपरिषद निर्मित अवकाश निरीक्षण केंद्रातून, यामुळे पर्यटनाबरोबर खगोल शास्त्राचा सुद्धा अभ्यास करण्याची पर्यटकांना पर्वणीच ठरणार आहे.
नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेतून आणि खगोल शास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनातून या केंद्राची निर्मिती केली आहे. यामध्ये अवकाशाच्या निरीक्षणाबरोबरच थ्रीडी थिएटरचा आनंद सुद्धा मिळणार आहे. याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी ८ मे रोजी येथील पेमास्टर पार्कजवळील अग्निशमन इमारतीमध्ये करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता या उपक्र माचे उद्घाटन माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दीपप्रज्वलनाने केले. याप्रसंगी व्हिजबल लाइट खगोल शास्त्राचे अभ्यासक प्रदीप नायक, पार्टिकल अक्सीलेटर खगोल अभ्यासक डॉ.अभय देशपांडे, मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेवक प्रसाद सावंत, शिवाजी शिंदे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. ९ मे ते १४ जून पर्यंत याचा आनंद पर्यटकांना मोफत घेता येणार आहे. तसेच थ्रीडी थिएटरच्या माध्यमातून विज्ञान विषयक माहितीपट, एस्ट्रोनॉमी, लहान मुलांसाठी डॉक्युमेंटरी दाखवली जाणार आहे. यासाठी नासाने निर्मित केलेल्या दुर्बिणीतून अभ्यास करण्याची पर्यटकांना जणू पर्वणीच ठरणार आहे. या उपक्र माला नगरपरिषदेने आकाशगंगा असे नाव दिले आहे. असा उपक्र म करणारी माथेरान नगरपरिषद ही देशातील पहिली नगरपरिषद म्हणून ओळखली जाणार आहे.
हा उपक्र म माथेरानमध्ये व्हावा यासाठी रायगड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी दिला आणि तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या प्रयत्नाने हा उपक्र म झाला म्हणून प्रसाद सावंत यांनी दोघांचे आभार मानले. हा कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी आकाश निरीक्षण केंद्राचे संचालक शैलेश संसारे,नगरपरिषद अभियंता देवेंद्र मोरखंडीकर, संदेश कदम, अन्सार महापुळे, विकास पार्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.