खांदा कॉलनीत झाड कोसळले; दुचाकी, रिक्षाचे नुकसान

By वैभव गायकर | Updated: July 5, 2024 18:37 IST2024-07-05T18:37:30+5:302024-07-05T18:37:39+5:30

सुदैवाने जीवितहानी टळली 

Tree fell in Khanda Colony; Damage to two wheeler, rickshaw | खांदा कॉलनीत झाड कोसळले; दुचाकी, रिक्षाचे नुकसान

खांदा कॉलनीत झाड कोसळले; दुचाकी, रिक्षाचे नुकसान


लोकमत न्युज नेटवर्क 
वैभव गायकर, पनवेलपनवेल पालिका हद्दीत ठिकठिकाणी झाडे उन्मळुन कोसळण्याच्या घटना घडत असताना दि.5 रोजी खांदा कॉलनी मधील खांदेश हॉटेल आणि फिनिक्स हॉस्पिटल जवळ झाड कोसळले या घटनेत तीन चाकी आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने या घटनेत प्रवासी सुखरूप बचावले.

पालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल वूड कटर मशीन च्या सहाय्याने आणि वृक्ष प्राधिकरण टीम यांच्या मदतीने सदर झाड तोडून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.अग्निशमन अधिकारी हरिदास सूर्यवंशी,उपअग्निशमन अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात संदेश ठाकूर, विशाल राऊत, सुदीप ठाकूर,गणेश सुंबे,आशुतोष खानावकर आदी पथकातील सदस्या अग्निशामक कार्य करीत  होते.एमएच.46 एझेड 8213 हा रमेश पाटील यांच्या मालकीचा रिक्षा होता तर एमएच.03, ईई 8219 हि दुचाकी श्रीनिवास वंगारी यांच्या मालकीची आहे.
 

Web Title: Tree fell in Khanda Colony; Damage to two wheeler, rickshaw

टॅग्स :panvelपनवेल